उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. सकल बहुजन समाजाच्या लोकांचा या मोर्चात लक्षणीय सहभाग होता. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला.
साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेलपासून सुरू झालेल्या या निषेध मोर्चात अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. चांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मोर्चाची समाप्ती करण्यात आली. यावेळी संबोधित करताना नसीम खान म्हणाले की, अमित शाह यांनी लोकसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनादर केला. आक्षेपार्ह विधान करणारे भाजपाचे अमित शाह यांनी जनतेसमोर जाहीर माफी मागावी. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी नसीम खान यांनी या मोर्चा दरम्यान केली.
अत्याचार वाढल्याचा आरोप
देशात भाजप सरकार आल्यापासून महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांत बहुजनावरील अत्याचारांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील परभणी, बीडमधील घटना असो किंवा मुंबईतील पवई येथील जयभीम नगरमधील मागासवर्गीय परिवारांना बेघर केल्याची घटना असो. अशा कितीतरी घटना संपूर्ण देशात घडत आहेत.
भाजप सरकार आणि त्यांचे नेते देशातील विविध समाजांवर अशा प्रकारचे भाष्य करून समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशातील 140 कोटी जनतेला लोकशाही पद्धतीने जगण्याचा आणि राहण्याचा अधिकार दिला आहे. भाजपा आणि त्याचे नेते अशाप्रकारचे भाष्य आणि समाजात तेढ निर्माण करीत असतील, तर देशातील जनता हे मुळीच सहन करणार नाही, असे म्हणत आम्ही अशा सरकार आणि नेत्यांचा जाहीर निषेध करीत आहोत.
Prashant Padole : अपघातस्थळी धावली खासदार पडोळेंची माणुसकीची गाडी !
या मोर्च्यात साधू कटके, प्रकाश बि-हाडे, गौतम साबळे, शंकर वाघ, योगिराज भोसले, कुमार कांबळे, वजीर मुल्ला, भरत सिंह, शहजादे शेख, मनोज तिवारी, रियाज मुल्ला, संजय उपाध्याय, मूर्तजा अंसारी, आशिष जाधव, नीलेश वाघमारे, रामभाऊ गजाकोश, संजय डावरे, आकाश बागले, अनिल लोंढे, शरद पवार, अशोक पोळ, रमेश बालेश, शहाजी गायकवाड, उत्तम गायकवाड, राकेश बनसोडे, दत्त निकम, अॅड. विजय कांबळे, अॅड. कैलाश अगावणे, रामेश्वर दवंडे, सहित सोनू यादव, सुरेन्द्र सिंह, अफताब आलम, सविता पवार, राधिका पवार, सुशीला यादव, परवीन शेख, हाजरा शेख, मिना भालेराव, रिटा सिंह, सुलोचना म्हाळसंघ, कमरुनीसा शेख, फरीदा शेख, मनाली गायकवाड, यांच्यासह हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित होते.