महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : गायकवाडांविरुद्ध दोन आमदारांना ठिय्या

Buldhana Police : पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची हालचाल

Statement About Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ कापून आणणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस दिले जाईल. बुलढाण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केले. गायकवाड यांच्या या विधानानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत काँग्रेसचे दोन आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते कुणाल चौधरी बुलढाणा पोलिसस ठाण्यात ठाम मांडून आहेत. 

राहुल गांधी जिंदाबाद

गुंड आमदाराला अटक करा, “राहुल गांधी जिंदाबाद, अशी घोषणाबाजी करीत शेकडो कार्यकर्ते पोलिस ठाण्यात निरीक्षकांच्या कक्षात ठिय्या देऊन आहेत. सहा तासांपासून सलग हे आंदोलन करण्यात आले. आपल्या वक्तव्यांनी आमदार संजय गायकवाड नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहतात. गायकवाड यांनी आतापर्यंत अनेकदा आक्रमक विधाने केली आहेत. आरक्षणाबाबत राहुल गांधी यांनी भाष्य केल्यानंतर गायकवाड यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

जीभ छाटण्याची भाषा

आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले. ही घोषणा त्यांनी सोमवारी (ता. 16) दुपारी बुलढाण्यात पत्रकार परिषदेत केली. गायकवाड यांच्या या विधानानंतर काँगेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आमदार गायकवाड यांच्याविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशन मधून उठणार नसल्याची भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसचे नेते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिस उपअधीक्षक सुधीर पाटील बुलढाणा पोलिस ठाण्यात पोहोचले.

Sanjay Gaikwad : राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस

दोन आमदार आक्रमक

काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे, आमदार राजेश एकडे, महाराष्ट्राचे प्रभारी कुणाल चौधरी यांनीही ठिय्या सुरू केला. काँग्रेसचे नेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, अॅड. जयश्री शेळके, अॅड. संजय राठोड, अरविंद कोलते, विजय अंभोरे, सुनिल सपकाळ, अॅड. गणेशसिंग जाधव, स्वाती वाकेकर, रामविजय बुरुंगले, अॅड. हरीश रावळ, धनंजय देशमुख, शैलेश खेडकर, अशोक सुरडकर यांनीही आंदोलन सुरू केले. जोपर्यंत गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

वक्तव्याचा निषेध

माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा, प्रकाश पाटील अवचार, मिलन आंबेकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली. रात्री उशिरा पर्यंतआमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस कोणत्या कलमान्वये गुन्हा नोंदवायचा यावर विचार करीत होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!