महाराष्ट्र

Buldhana : नगरपालिकेसमोर काँग्रेसचे “डफडे बजाओ” आंदोलन

Khamgaon : माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले नेतृत्व 

Protest by Congress : गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहाराच्या नगर परिषदेतील अंधेरी नगरी चौपट राज, असा कारभार सुरु असून बेकायदेशीर कामांना मान्यता देऊन मलीदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची विकासकामे केली जात आहे. याशिवाय शहरातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी तसेच अनियमिततेबाबत आरोप करीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात नगरपालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पक्षाच्यावतीने यापूर्वी पालिकेला या प्रकरणी निवेदन दिले होते. या निवेदनाची पालिकेने प्रशासकीयस्तरावर दखल घेतली नाही. मागितलेली माहिती उपलब्ध करुन न दिल्यामुळे शहरवासीयांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद प्रशासनाची झोप उघडण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात पालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात 8 ऑगस्ट क्रांतीदिनी काँग्रेस पक्षाकडून नगरपालिकेसमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजपाच्या आमदारासह नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करीत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सकाळपासून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर डफडे बजाओ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था निकृष्ट दर्जाची कामे, शहराला भेडसावणारी पाणी समस्या अवैध व्यवसाय आणि कमिशन खोरी, आदी मुद्दे घेऊन या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले होते.

Shrikant Shinde : ठाकरेंची एवढी लाचारी फक्त मुख्यमंत्रिपदासाठी 

फुंडकर यांच्यावर आरोप 

खामगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आकाश फुंडकर यांच्यावरही माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ‘एकच वादा तोंड वाला दादा’ असे घोषवाक्य लिहून, शाळा सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मलिदा लाटल्या जात असल्याचा आरोप सानंदा यांनी यावेळी केला आहे. मुख्याधिकाऱ्याला आंदोलनासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

.. तर काळे फासणार 

शहरात झालेली आणि सुरू असलेली निकृष्ट दर्जाच्या कामांची तपासणी करण्यात यावी. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा तात्काळ पूर्वक कराव्या. पंधरा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा, आदी मागण्यांकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर पुढील आंदोलनामध्ये मुख्याधिकारी शेळके यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी दिला आहे.

 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!