Vidarbha Politics : भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांच्या रोषाचा चांगलाच सामना करावा लागला. विविध आठ विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. 24) भंडारा येथे आले होते. दुपारच्या सुमारास शिंदे यांच्या शासकीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळातच मात्र गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली. यावेळी मुख्यमंत्री मुर्दाबादच्या घोषणाही लागल्या. पोलिसांनी याप्रकरणी वेळीच हस्तक्षेप केला.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
विकास कामांना निधी मंजूर झाल्यानंतर सोमवारी एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्यात आठही कामांचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेत्यांनी दांडी मारली. खासदार प्रफुल्ल पटेलही कार्यक्रमस्थळी नव्हते. त्यामुळे सुरूवातीपासूनच हा कार्यक्रम चर्चेत होता. अशातच कार्यक्रमात त्यावेळी गोंधळ उडाला, जेव्हा प्रकल्पग्रस्तांनी नारेबाजीला सुरुवात केली.
व्यक्त केला संताप
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा भंडारा जिल्ह्यात गंभीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांपैकी दोन जणांनी नारेबाजीला सुरुवात केली. बाधित लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नारेबाजी केली.
Bhandara News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दिग्गज नेत्यांची दांडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुर्दाबादच्या घोषणांनी त्यांनी परीसर दणाणून सोडला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला. नारेबाजीला सुरुवात होताच पोलिसांची धावपळ झाली. तत्काळ पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या दोन्ही इसमांना ताब्यात घेतले.
यापूर्वीही संताप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार काही महिन्यांपूर्वी पूर्व विदर्भात दौऱ्यावर आले होते. त्यावेळीही गोसेखुर्द प्रकल्पातील बाधितांनी त्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला होता. गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला त्यावेळीही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
NCP Politics : महायुतीचे सरकार तीनच महिने ; लवकरच मविआचे सरकार
या इसमाला एका इमारतीच्या जिन्यात बंद करण्यात आले होते. परंतु भंडाऱ्यातून ‘टेकऑफ’ करण्यापूर्वी एकनाथ शिंदे या आंदोलनकर्त्याला हेलीपॅडवर बोलावून घेतले होते. प्रहार पक्षाचा हा कार्यकर्ता होता. भंडारा सोडण्यापूर्वी शिंदे यांनी मागण्या मान्य करणार असल्याचा शब्द दिला होता.
पुन्हा विचारला जाब
गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. अशातच गेल्या दौऱ्यात शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविले जातील असा शब्द दिले होते. आता पुन्हा शिंदे भंडाऱ्यात आल्यानंतर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी त्यांना ‘क्या हुआ तेरा वादा’ असा जाब विचारला आहे. मात्र या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली आहे. गोसेखुर्द प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भासाठी यक्षप्रश्न बनला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाशी संबंधित समस्या आणि अडचणी सुटता सुटेनाशा त्यामुळे झाल्या आहेत.