महाराष्ट्र

Birsi Issue : ‘टेकऑफ’साठी पटेलांचा ‘सुपर रनवे’; पण त्यांचे काय?

Praful Patel : गोंदियातील बिरसीवासीयांना कोण, कधी देणार न्याय?

Gondia District : गोंदिया जिल्हयात बिरसी येथे विमानतळ तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात विमानतळ झाल्याने श्रेय लाटत आपल्यामुळेच विमानतळ होऊ शकले असा घाट प्रफुल्ल पटेलांनी घातला खरा; परंतु ज्यांनी विमानतळा साठी जागा दिली. ते 22 वर्षांपासून समस्या सहन करीत आहेत.

प्रकल्पग्रस्त 106 कुटुंबांना अद्यापही मूलभूत सुविधांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ज्या प्रफुल्ल पटेलांनी विमानतळ आणले त्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे.

या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा मागील 22 वर्षांपासून निवाऱ्यासह मूलभूत गरजांसाठी शासन आणि प्रशासनाशी लढा सुरू आहे. परंतु अद्यापही शासन, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त कुटुंबांमध्ये रोष व्याप्त आहे. कुणीही निवडून आल्यास त्यांनी किमान येथील समस्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ

गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले. या विमानतळामुळे परिसरातील 106 कुटुंब प्रकल्पग्रस्त झालीत. मात्र प्रकल्पग्रस्तांना दिले जाणारे लाभ आणि निवाऱ्यासाठी भूखंड उपलब्ध करून दिला नाही. या भूखंडाची प्रकल्पग्रस्तांना आली नाही. अद्यापही करून रजिस्ट्री देण्यात ज्या ठिकाणी हे भूखंड उपलब्ध करून देण्यात आले, त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा नाही. त्यामुळे तिथे जाऊन घरे बांधायची कशी आणि राहायचे कसे? असा बिकट प्रश्न या 106 प्रकल्पग्रस्त कुटुंबांसमोर आहे.ज्या ठिकाणी भूखंड उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नाही.

Ramdas Athawale : राज्यसभा सदस्यत्व, केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळेलच

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकारणी कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यात अव्वल दर्जाचे ठरले आहेत. जिल्ह्यात अनेक उद्योग प्रकल्प आले खरे,मात्र ते प्रकल्प भंडारा- गोंदिया जिल्ह्याकरांसाठी फायद्यापेक्षा समस्याचे अधिक ठरले आहे. त्यात मग गोसीखुर्द प्रकल्प असो की मग बिरसी एअरपोर्ट! याचा लाभ जिल्ह्याला होईल हेच मानले जात असतांना तोच या उद्योग प्रकल्पाने प्रकल्पग्रस्तांची ‘नवीन पिढीच’ तयार करून ठेवली आहे.त्यामुळे प्रकल्प आणण्याचे श्रेय जसे घेता;तसे त्यांच्या समस्याच्या कारणाचे श्रेय सुद्धा घ्या, अशी मागणी आता जिल्हावासीय करीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!