Jalgaon, Raver constituency : जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. त्यानंतर मतदान यंत्र सीलबंद करून बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलच्या स्ट्राँग रुममध्ये हलविण्यात आले. स्ट्राँग रुमसाठी 27 पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) तसेच राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) यांची प्रत्येकी एक तुकडी तैनात केली आहे. परिंदा पर नहीं मार सकता अशी व्यवस्था आहे.
4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे (ईव्हीएम) मशीन ठेवण्याकरिता जळगाव एमआयडीसीतील कुसुंबा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात स्ट्राँग रूम उभारण्यात आली. या स्ट्रॉंग रूम मध्ये मतदानानंनतर सर्व ईव्हीएम मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गोदाम क्रमांक 14 व जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गोदाम क्रमांक 15 येथे स्ट्राँग रूम तयार करण्यात आली आहे. याच परिसरातील गोदाम क्रमांक 16 येथे जळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी व गोदाम क्रमांक 17 येथे रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.स्ट्राँग रुममधील बंदोबस्त आणि सुरक्षाव्यवस्थेचा दररोज आढावा घेण्यात येत आहे. विशेष महानिरीक्षकांसह जिल्हाधिकार्यांकडून स्ट्रॉंग रूमची तपासणी झालेली आहे.
दोन शिफ्टमध्ये बंदोबस्त !
स्ट्राँग रुम बंदोबस्तासाठी सहायक पोलिस आयुक्त – 1, पोलिस निरीक्षक – 2, सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – 4, पोलिस अंमलदार – 20 तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीएफ यांच्या प्रत्येकी एक अशा दोन प्लाटून तैनात केल्या आहेत. एका प्लाटूनमध्ये दोन अधिकारी तसेच 30 कर्मचारी असे 32 जवान असतात. सकाळी आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ अशा दोन शिफ्टमध्ये बंदोबस्त सुरु आहे.
डबल-लॉक सिस्टम
स्ट्रॉंग रूमच्या खोल्या दुहेरी लॉक सिस्टीममध्ये सील केल्या आहेत. 30 पेक्षा जास्त क्लोज सर्किट (CC) पाळत ठेवणारे कॅमेरे असल्यामुळे स्ट्राँग रूम्सपर्यंत पोहोचणे मानवीदृष्ट्या अशक्य आहे. वरिष्ठ अधिकारीही स्ट्राँग रूमच्या बाहेरूनच सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करू शकतात. संपूर्ण कॅम्पसवर पाळत ठेवण्यात आली आहे. सर्व स्ट्राँग रूमच्या प्रवेशद्वाराजवळ सशस्त्र केंद्रीय दल 24×7 जागरुक ठेवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर लावलेल्या लॉग बुकमध्ये स्वाक्षरी केल्याशिवाय जिल्हा निवडणूक प्राधिकरणासह कोणालाही स्ट्राँग रूमजवळ येऊ दिले जात नाही.