महाराष्ट्र

Washim : पोहरादेवीला येणारे मोदी ठरले पहिले पंतप्रधान

Narendra Modi : काँग्रेसने बंजारा समाजाचा अपमानच केला

Tour Of Prime Minister : बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (5 ऑक्टोबर) भेट दिली. मोदी पोहादेवी येथे येणारे पहिले पंतप्रधान ठरले. मोदींच्या हस्ते विरासत-ए- बंजारा नगारा वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण झाले. मोदींनी नगारा वाजवत प्रतिसाद दिला. काँग्रेसने नेहमीच बंजारा समाजाचा अपमान केला असे मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेसचे सरकार आले सुरू असलेल्या सगळ्या योजना बंद होतील. तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्याचा आरोपही मोदींनी केला.

दिल्लीत ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सुत्रधार काँग्रेसचा नेता असल्याचा आरोप मोदींनी केला. इंग्रजी हुकुमशांप्रमाणेच काँग्रेसचा परिवार दलित, पिडीतांना आपल्या बरोबरीचे मानत नाही. पोहरादेवी येथील कामावरुन मोदींनी महाविकास आघाडी सरकावर देखील टीका केली. अर्बन नक्षलवादी काँग्रेसला चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन मोदींनी केले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पोहरादेवीत संग्रहालयाची सुरुवात झाली. त्यामुळे मोदींनी फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले. लाडकी बहिण योजना नारी शक्ती वाढवणारी योजना आहे, असे ते म्हणाले.

बंजारा भाषेचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेतून केली. या वेळी त्यांनी सेवालाल महाराजांचा जयजयकार करत उपस्थित नागरिकांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते लाकडी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना चेकचे वितरण करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) असताना एकही रुपयाही मिळाला नाही, असेही मोदी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बंजारा समाजाला संबोधित केले. मोदींच्या नेतृत्त्वात या राज्याचे सरकार सर्व समाजाला न्याय देण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. आपले सरकार आता लाडके सरकार झाले असल्याचेही ते म्हणाले.

PM Naredra Modi : नरेंद्र मोदींचीही ईडी कार्यालयात झाली होती 9 तास चौकशी

पंतप्रधान यांचे कौतुक..

मोदी महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा येतात, तेव्हा ते भरभूर निधी देत असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. पोहरादेवी येथे आज खऱ्या अर्थाने काशी उभी राहिल्याचे ते म्हणाले. रामराव महाराजांची इच्छा पूर्ण करण्याचा योग मोदींच्या नशीबात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. पवार जेव्हा देशाचे कृषीमंत्री होते, तेव्हा ते खेळाच्या मैदानावरच जास्त दिसत होते. असा आरोप त्यांनी केला. रामराव बापुंनी नरेंद्र मोदी यांना पोहरादेवीला येण्याची विनंती केली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोदी हे पोहादेवीला येणारे पहिले पंतप्रधान असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी उपस्थित नागरिक खुर्च्यावर चढले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सर्वांना शिस्तीची आठवण करुन दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!