महाराष्ट्र

Pravin Darekar : स्वतःच्या पक्षाला काळीमा फासण्याचा इतिहास

Monsoon Session : निलंबन झाले तरी सभागृहात जोरदार गोंधळ

Maharashtra Legislature : विधान परिषदेत 2 जुलै रोजी गोंधळ पाहायला मिळाला. भाजप आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात शिवीगाळ झाल्याने विधान परिषदेत वादग्रस्त वातावरण निर्माण झाले व दोघांमधील वाद विकोपाला गेला. यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पुढच्या पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यावर आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी वक्तत्व केले आहे. 

विधिमंडळाचे सर्वोच्च असे सभागृह विधान परिषद समजल्या जाते. वैभवशाली परंपरा विधिमंडळाची आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचा समकक्ष अधिकार जबाबदारी विरोधी पक्ष नेत्यावर असते. परंतु या सर्व गोष्टीचे भान विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना राहिलेले नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत अपमान करणारे जे वक्तव्य केले त्या संदर्भात प्रसाद लाड भूमिका मांडत होते. आक्रमक पवित्रा घेऊन प्रसाद लाड यांनी भूमिका मांडली. परंतु याचे उत्तर देताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडून अनपेक्षित असे कृत्य घडले. दानवे यांनी जागेवरून बाहेर निघत लाड यांना आई बहिणीच्या नावावरून शिवीगाळ केली. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये हा सर्व प्रकार घडला. या प्रकारे अशोभनीय वक्तत्व कधीच झाले नव्हते, तर दानवे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

पश्चाताप करण्याऐवजी वाहवाही 

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, अनेक थोर महिलांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आहे. महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. या सभागृहात देखील आमच्या माता-भगिनी उपस्थित आहेत. सर्व गोष्टीत महिलांच्या सन्मानाचा विसर विरोधी पक्षाला पडलेला आहे. रागाच्या भरात संतापून अशा प्रकारच्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करण्याऐवजी, केलेली गोष्ट योग्य आहे, असे दानवे म्हणतात.

Sudhir Mungantiwar : वीजतार चोरणाऱ्यांना आता कारवाईचा शॉक

आपण केलेल्या चुकीवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्याचं काम अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांसमोर केलं आहे. दानवे यांच्या कृत्याविरोधात सभापतींनी कठोर निर्णय घ्यावा, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

सभागृहात आम्ही निलंबनाची मागणी केली होती. झालेला सर्व प्रकार लक्षात घेऊन अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. गैर वर्तनामुळे त्यांचे निलंबन झाले, असे दरेकर म्हणाले .महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे निलंबित झालेला हा पहिला नेता आहे. अंबादास दानवे यांनी त्यांच्या पक्षाला आणि उबाठाला काळा डाग लावला आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला.

विरोधकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला. दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी घोषणाबाजी केली होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!