महाराष्ट्र

Pravin Darekar : टोमणेबाजी हा उद्धव ठाकरेंचा स्थायीभाव

Mahayuti : चार भिंतीत होणाऱ्या गोष्टी माध्यमांत करू नये; दरेकरांचा कदम यांना सल्ला

Political War : विधानसभा निवडणुक तोंडावर आहे. अशात महायुतीमध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी भाजपवर एकामागून एक आरोपांचे बाण सोडत एकच खळबळ उडवून दिली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातला हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपमुळेच शिवसेनेला सर्वात जास्त त्रास आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्याला भाजपच कारणीभूत आहे. असे आरोप रामदास कदम यांनी केले आहेत. त्यामुळे भाजपने देखील रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे.

तेढ निमार्ण करणारे वक्तव्य  योग्य नाही

रामदास कदम हे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत. भाजप आणि शिवसेनेत तेढ होईल, ज्यामुळे महायुतीला पडसाद भोगावे लागतील, अशा प्रकारचे वक्तव्य कदम यांनी करणे योग्य नाही. उणीधुणी काढायची झाली तर प्रत्येक पक्ष एकमेकांविषयीची उणीधुणी काढतील. परंतु त्यामुळे महायुतीत विसंवाद होऊ शकतो. अशा गोष्टी चार भिंतीत, तिन्ही पक्षाच्या समन्वय बैठकीत चर्चेदरम्यान व्हायला हव्या.असा सल्ला भाजपचे प्रविण दरेकर यांनी कदम यांना दिला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अनिल परब हे वकील आहेत. निवडणुकीबाबत जाणकार असलेले आमदार आणि कार्यकर्ते आहेत. नोंदीच्या बाबतीत त्यांचे काही आक्षेप होते. आक्षेप घ्यायला वेळ असतो त्यावेळी का नाही आक्षेप घेतला? रडीचा डाव अनिल परब यांनी खेळू नये. कदाचित असलेल्या मतदार यादीतून त्यांना स्वतःचा पराभव दिसत असेल. पराभव झाल्यानंतर त्याची कारणे ते आताच शोधून ठेवत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या विधानाला उत्तर देत प्रवीण दरेकर म्हणाले, दुसऱ्यांना टोमणे मारणे, दुसऱ्याचा मत्सर करणे, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना टोमण्याच्या पद्धतीत बोलणे हा उद्धव ठाकरे यांचा स्थायीभाव झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेत समोर बसलेल्या पाचशे-हजार लोकांना ते बरे वाटत असेल. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारची टोमणेबाजी आवडत नाही, याची जाणीव उद्धव ठाकरेंना होत नसावी. असे दरेकर म्हणाले.

महायुतीच्या उमेदवाराला दापोलीतून तुम्ही किती मताधिक्य दिली? याचं उत्तर कदम यांच्याकडे आहे का? दापोलीत झालेलं मतदान काय दाखवून देतं? असे प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केले आहे. त्यामुळे महायुतीत राहून मंत्री किंवा नेत्यांविषयी बोलणे पूर्णतः चुकीचे आहे. असे दरेकर म्हणाले.

Pratibha Dhanorkar : एवढी ‘अंगार’ तर बाळूभाऊंनी पण नव्हती केली !

कोकणात रविंद्र चव्हाण यांच्यामुळेच यश मिळाले आहे असा दावाही भाजपने केला आहे. असा धावा करून रामदास कदम यांच्या आरोपांना तोंड देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर कल्याणची श्रीकांत शिंदे आणि ठाण्याची नरेश म्हस्के यांची जागासुध्दा रवींद्र चव्हाण यांनीच जीवाची बाजी लावून निवडून आणली आहे. असे असताना चव्हाण यांच्यावर कदम यांनी केलेले आरोप, हे दुर्दैवी असल्याचे दरेकर म्हणाले.

error: Content is protected !!