महाराष्ट्र

Akola MNS : प्रशंसा अंबेरे ‘पश्चिम’च्या रेस मधून बाहेर

Election Officer : अवघ्या 24 दिवसांनी वय पडले कमी

Nomination Disqualified : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे या विधानसभा निवडणुकीच्या स्पर्धेतून बाद झाले आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अंबेरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिली होती. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु छाननी करताना निवडणूक अधिकाऱ्यांना अंबरे या उमेदवारासाठी असलेल्या वयाचा निकष पूर्ण करीत नाहीत, हे लक्षात आले. त्यामुळे नियमानुसार प्रशंसा अंबेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. 

25 वर्षांचा..

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार किंवा 25 वर्षांचा असणे गरजेचे आहे. प्रशंसा अंबेरे यांचे वय 24 दिवसांनी कमी असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. अंबेरे यांनी अर्जासोबत जोडलेल्या जन्म तारखेच्या आणि इतर पुराव्यांची तपासणी केल्यानंतर त्या वयाच्या निकषात बसत नसल्याचे अधिकाऱ्यांना लक्षात आले. त्यामुळे निवडणूक कायद्याप्रमाणे प्रशंसा अंबेरे या विधानसभा निवडणूक लढण्यास पात्र नसल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. बुधवारी (30 ऑक्टोबर) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशंसा अंबेरे यांच्या उमेदवारी अर्ज खारीज केला.

एकमेव महिला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर प्रशंसा अंबेरे यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते. मनसे मधील अन्य कोणतेही नेत्यांनी मात्र उमेदवारी मागितली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणूक जिंकणे शक्य नाही. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यास झालेला खर्चही वाया जाईल आणि त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होईल असे काहींचे मत होते. त्यामुळे मनसे मधील अनेक दिग्गजांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रशंसा अंबेरे यांचे नाव उमेदवारांच्या यादीत समाविष्ट केले.

मनसेने संधी दिल्यामुळे प्रशंसा अंबेरे यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तयारीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता त्या निवडणुकीच्या रेसमधून ‘आउट’ झाल्या आहेत. अकोल्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद बघता प्रशंसा अंबेरे या निवडणुकीत विजयी होऊ शकत नाहीत, असे ठामपणे मानले जात होते. परंतु अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जुने शहर भागात त्यांचा बऱ्यापैकी जनसंपर्क असल्याने या भागातील मतांची विभाजन अंबेरे यांच्यामुळे होऊ शकते असे दिसत होते.

बंडखोरी

भारतीय जनता पार्टीत आधीच बंडखोरी झाली आहे. विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाल्याने माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांनी बंडखोरी केली आहे. जुने शहरातील भाजपचे जुने पदाधिकारी डॉ. अशोक ओळंबे हे देखील बाहेर पडले असून त्यांनी प्रहार कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रशंसा अंबेरे यांच्यासह या सर्व उमेदवारामुळे पश्चिम मधील हिंदू मतांचे विभाजन अटळ होते. अशात आता अंबेरे यांचा अर्ज बाद झाल्याने अगदी किंचित प्रमाणात हे विभाजन टळणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!