महाराष्ट्र

Buldhana Constituency : अडचणीत आले नाही प्रतापराव, कारण मदतीला आले जामोद अन् खामगाव

Lok Sabha Result : बुलढाणा मतदारसंघातून झाले चौथ्यांदा विजयी 

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा मतदारसंघातून विक्रमी विजय साकारत विजयाचा चौकार लगावला आहे. २९ हजार ३७६ च्या फरकाने त्यांनी हा विजय मिळविला आहे. २०१९ च्या निवडणुकीपेक्षा प्रचंड कमी मताधिक्क्याने यंदा जाधव निवडूण आले आहे. प्रतापराव जाधवांच्या या निसटत्या विजयात जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदार संघांची भूमिका निर्णायक ठरली आहे, हे मात्र नक्की. 

बुलढाण्यात शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या लोकसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा विजयश्री खेचत आणली आहे. त्याचवेळी गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिळालेल्या मताधिक्याने मात्र त्यांना यावेळी हुलकावणी दिली. लोकसभेच्या रिंगणातील लढत आणि परिस्थिती यावेळी वेगळी असली, तरी २०१९ च्या निवडणुकीत १ लाख ७३ हजार मतांनी आणि २०१४ च्या निवडणुकीत १ लाख ६० हजार मतांनी विजय मिळविणाऱ्या प्रतापराव जाधवांना २९ हजार ३७६ च्या निसटत्या विजयाचा सामना करावा लागला आहे.

खामगाव, जळगाव जामोदने राखली लाज

जाधव यांच्या या विजयात खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे मोठे योगदान आहे. खासदार जाधव यांना सुरुवातीपासूनच घाटाखालील तालुक्यातून मताधिक्य मिळत असल्याचा प्रघात आहे. यावेळीही खामगाव, जळगाव जामोद मतदारसंघातून त्यांना चांगलेच मताधिक्य मिळाल्याने त्यांची विजयाकडे वाटचाल झाली.

Lok Sabha Result : महंत भडकले..! सोन्याच्या लालसेत रावणासोबत गेले असते.. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक फेरीनिहाय पुढे येणाऱ्या मतांच्या आकडेवारीतून उमेदवारांसह समर्थकांची उत्कंठा अखेरपर्यंत वाढतच होती. काही फेऱ्यांनंतर अवघ्या १२-१३ हजारांनी आघाडी घेत शेवटी २९,३७६ मतांनी जाधव विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी खेडेकर यांनाही त्याच प्रमाणात मते मिळत होती. या परिस्थितीत अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना मिळालेली मते लक्षवेधक ठरत होती. दोन्ही तुल्यबळ उमेदवारांच्या मत संख्येचा त्यांनी सतत पाठलाग केला. अखेर २ लाख ४८ हजार ९७७ मते मिळाली असतानाच विद्यमान जाधव यांना गेल्या दोन निवडणुकांत मिळालेले मताधिक्य लाखाने घटले.

२०१९ च्या तुलनेत त्या मतांमध्ये ३४ टक्के म्हणजे १ लाख ७३ हजार ७३९ तर २०१४ च्या तुलनेत ३२ टक्के म्हणजे १ लाख ६० हजार ९६० मतांची घसरण झाली. २०१९ मध्ये जाधव यांचे प्रतिस्पर्धी असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे या निवडणुकीत त्यांच्यासोबत होते. त्यांना त्यावेळी ३,८८,६९० मते मिळाली होती. ती संख्या पाहता जाधव यांच्या मताधिक्यात वाढ होण्याची अपेक्षा समर्थकांना होती.

या निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशा दोन उमेदवारांतच थेट लढत आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट झाले. त्याचा फटकाही या पक्षाच्या उमेदवारांना बसला तर पर्याय म्हणून मतदारानी थेट अपक्षाला पसंती दिल्याचेही या मतदानातून दिसून आले.

वंचितचे मतदानही घसरले !

२०१९ मध्ये वंचितने बळीराम सिरस्कार यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उतरवले होते. त्यांना त्यावेळी १ लाख ७२ हजार ६२७ मते मिळाली होती. यावेळी पक्षाने वसंत मगर यांना रिंगणात उतरवले, त्यांना लाखाचा आकडाही पार करता आला नाही. सिरस्कार यांच्यापेक्षा ७४ हजार ५७५ मतांनी ते माघारले. त्यामुळे वंचितचे मतदानही घसरल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!