महाराष्ट्र

Modi 3.0 : पदभार स्वीकारताच जाधवांची मोठी घोषणा !

NDA Government : प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच मिळवले राज्यमंत्री पद

Shivsena News : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल (ता. 11) पदभार स्वीकारला. लगेच त्यांनी मोठी घोषणा केली. मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प जाधव यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असल्याचे ते म्हणाले.

गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण काम करणार आहे. देशातील सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट आरोग्य सुविधांचा लाभ कसा मिळेल, या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले. नुकतेच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी पहिल्यांदाच राज्यमंत्रिपद मिळवले आहे. ते शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांना केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण मंत्री हे पद मिळाले आहे. नरेंद्र मोदींचे नव्या मंत्रीमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

प्रतापराव जाधव यांनी काल 11 जून रोजी केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी एक स्तुत्य निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. यात त्यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. आपल्या देशात मरणोत्तर अवयदान करणाऱ्याचा टक्का अत्यल्प आहे. हा टक्का वाढणे गरजेचे असून आपणही मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे, असे म्हणत नवं नियुक्त खासदार आणि केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी हा संकल्प जाहीर केला.

देशातील प्रत्येक नागरिकाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार आहो. गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे. देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्याचा लाभ उत्तमरीत्या कसा मिळेल, या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!