महाराष्ट्र

Yoga Day : नरेंद्र मोदी अन् प्रतापरावांचा असाही योगा‘योग’

Buldhana : आंतरराष्ट्रीय योगदिन ठरला बुलढाण्यासाठी अविस्मरणीय

Prataprao Jadhav : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर 21 जून रोजी झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय सोहळ्यात त्यांच्या समवेत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती मंचावर होती. बुलढाणा जिल्ह्यासाठी ही बाब गौरवास्पद ठरली आहे. संसदेत पुन्हा नेतृत्व करण्याची संधी दिल्याने जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. आयुष आणि आरोग्य मंत्रालयाची धुरा सोपविल्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात प्रतापराव जाधव यांना सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाधव यांना ‘योग’ साधता आल्याने आंतरराष्ट्रीय योगदिन बुलढाणा जिल्हावासीयांसाठी अविस्मरणीय ठरला.जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे शुक्रवारी (ता. 21) जागतिक योगदिनाचा अभूतपूर्व सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योगदिन कार्यक्रमात सहभाग नोंदवून साधना केली. योगासनाची विविध प्रात्यक्षिके सादर करण्याचा केंद्रीय मंत्र्यांच्या रुपातील मान जाधव यांना पहिल्यांदाच मिळाला अन् तोही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत.

राजकीय वजनात वाढ

लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना जिल्ह्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले. संसदेत पुन्हा नेतृत्व करण्याची संधी दिल्याने जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यातच आयुष आणि आरोग्य मंत्रालयाची धुरा सोपविल्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात त्यांना मोठ्या आदराने सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला.

Pune Porsche Car : जामीन मंजूर, पण मुक्काम कारागृहातच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत प्रतापराव जाधव यांनी योग साधना केली. विजयाचा चौकार मारल्यामुळे जाधव यांनी मंत्रिपद मिळेल यात शंकाच नव्हती. परंतु आता ते थेट मोदींसोबत दिसल्याने त्यांच्या कुंडलीतील ग्रहताऱ्यांचे राजयोग आणखी बलवान झाल्याचे दिसत आहे.

केंद्रीय मंत्री पदाची सूत्रे हाती आली आणि योगायोगाने योगदिनही जुळून आला. या पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी योगदिनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

Congress : गांधी लढे थे गोरों से, हम लढेंगे चोरोसे!

त्याला प्रतिसाद देत ठिकठिकाणच्या योगदिन कार्यक्रमात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत योग साधना ही आयुर्मान वाढविणारी आणि निरोगी आयुष्याची शिदोरी देणारी असल्याने प्रत्येक नागरिकांनी योग प्राणायाम केलेच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. निरामय निरोगी आयुष्यासाठी योग, प्राणायाम एक वरदानच आहे, असा संदेश प्रतापराव जाधव यांनी योगदिनी देशवासियांना दिला.

सोहळ्याचे साक्षीदार

जागतिक योगदिनाचा मुख्य सोहळा जम्मू काश्मीरमध्ये पार पडला. या सोहळ्याच्या संयोजनात महत्वाची भूमिका निभावणारे बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झळकले. बुलढाण्याचा सन्मान वाढविणारा हा अभूतपूर्व सोहळा जिल्हावासीयांनी याची देही, याची डोळा पाहिला. जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना यंदा मोठा बहुमान लाभल्याने दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यातही जागतिक योग दिन यंदा उत्साहात साजरा करण्यात आला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!