प्रशासन

Buldhana : ‘प्रशासन गाँव की ओर’, सुशासनासाठी एक राष्ट्रीय चळवळ !

Prashasan gaon ki or : 'शासन आपल्या दारी'नंतर आता शासनाचा नवा उपक्रम

District Collector Sadashiv Shelar : बुलढाणा जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाँव की ओर’ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. 

या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (12 डिसेंबर) बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पौळ, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसिलदार संजय गांधी आणि विविध विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाँव की ओर’ मोहिमेंतर्गत प्रशासनातील विविध विभागांच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सदाशीव शेलार यांनी प्रशासनाला तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आराखडा तयार करावा. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारुन घ्यावे. प्रलंबित तक्रारींचा निपटारा करुन घ्यावा. या मोहिमेला विशेष प्राधान्य देवून नियोजन करावे, असे निर्देश शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवायची आहे. या मोहिमेदरम्यान विभागांनी अभिनव उपक्रम राबवावेत. विभाग प्रमुखांनी अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे यांनी दिले. ‘सुशासन सप्ताह- प्रशासन गाँव की ओर’ मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भात 23 डिसेंबर रोजी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत गावपातळीवर शिबिरे आयोजित करुन विविध सेवांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारीं, अर्जांचा निपटारा करुन सेवांचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

राज्यभर होणार अमलबजावणी.. 

प्रशासन गाव की ओर, सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी ही देशव्यापी मोहीम आहे. भारतातील सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत ही मोहिम राबवली जाणार आहे. प्रशासन गाव की ओर ही विकेंद्रित आवृत्ती आहे. या मोहिमेत 700 हून अधिक जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत.

अधिकारी तहसील आणि पंचायत समिती मुख्यालयांना भेटी देणार आहेत. सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी भारत सरकार तहसील स्तरावर राष्ट्रीय मोहीम राबविण्याची ही तिसरी वेळ आहे. प्रशासन गाव की ओर अभियान सुशासनासाठी एक राष्ट्रीय चळवळ निर्माण करेल, जी भावी पिढ्यांना प्रेरणा देईल.

Chandrapur : महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर उखडले आमदार जोरगेवार !

या विषयासंदर्भातील तक्रारी सोडविणार –

सेवा वितरण अंतर्गत अर्ज निकाली काढणे

राज्य तक्रार पोर्टलवर तक्रारींचे निवारण

CPGRAMS मध्ये तक्रारींचे निवारण

ऑनलाइन सेवा वितरणासाठी जोडलेल्या नवीन सेवांची संख्या

उत्तम सुशासन पद्धती

सार्वजनिक तक्रारींमधील यशोगाथा

23 डिसेंबर 2024 रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नवोपक्रमांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत संस्थांचे डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण या उद्देशाने नवकल्पनांवर भर दिला जाईल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!