महाराष्ट्र

Lok Sabha Election : शेंडगेंचा पाठिंबा आंबेडकरांनी काढला

Sangali Constituency : सातत्याने नाट्यपूर्ण घडामोडीनंतर निर्णय

Vanchit Bahujan Aghadi : सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

प्रकाश शेंडगे यांना दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने विशाल पाटील यांचे पारडे जड झाले आहे. आता विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. 2019 मधील निवडणुकीत देखील तिरंगी सामन्याचा फटका विशाल पाटलांना बसला होता. त्यावेळी विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरीकडून लढले होते. आता सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्याने विशाल पाटलांची अडचण झाली. सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी सांगलीचा प्रश्न दिल्लीपर्यंत नेला. पण काहीही झाले नाही. त्यामुळे विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला.

Lok Sabha Election : विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे भवितव्य काय ?

वेगाने घडामोडी

सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाट्यपूर्ण घडामोडी होत आहेत. आता सांगली लोकसभेचे गणित बदलणार अशी चर्चा देखील रंगू लागली आहे. गेल्या निवडणुकीत ज्या वंचितमुळे पाटलांचा पराभव झाला, त्याच वंचितने आता पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चित्र बदलणार आहे. सांगलीतून ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे निवडणूक रिंगणात आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना आधीच पाठिंबा दिला होता. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच वंचितने भूमिका बदलली.

काय म्हणाले आंबेडकर

विशाल पाटील अपक्ष लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, अशी घोषणा प्रकाश आंबेडकरांना केली आहे. याबाबत विशाल पाटील यांचे बंधू आणि सांगलीचे माजी खासदार प्रतीक पाटील यांनी आंबेडकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वंचितने आता विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विशाल पाटलांचे बळ वाढले आहे. मागील निवडणुकीत सांगलीत वंचितने 3 लाख मतं घेतली होती. त्यामुळे वंचितचा पाठिंबा विशाल पाटील यांच्यासाठी गेमचेंजर ठरु शकतो, असे मानले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!