महाराष्ट्र

Lok Sabha Election : आंबेडकर म्हणतात, साताऱ्यातील एकाला व्हायचेय राज्यपाल

Satara Constituency : काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण

Vanchit Bahujan Aghadi : सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर आहे. त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे जाहीर होणे केवळ बाकी आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी हा गौप्यस्फोट केला. सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे प्रमुख प्रशांत कदम यांच्या प्रचारसभेसाठी आलेले डॉ. आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा महासचिव शरद गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हे बडे प्रस्थ कोण यावर बोलणे आंबेडकर यांनी टाळले. आता हे बडे प्रस्थ कोण यावर काथ्याकूट होणार आहे. आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे अनेकजण संशयाच्या भोवऱ्यात असणार आहेत. सातारा जिल्ह्यात वंचितने माजी सैनिक उमेदवार दिला आहे. कराडच्या सभेत मोदी 20 मिनिट सैनिकांवर बोलले. त्यामुळे आमची ही उमेदवारी भक्कम झाली आहे. जिल्ह्यात 40 हजार माजी सैनिक आहेत, असे सांगत डॉ. आंबेडकरांनी साताऱ्यातून वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा दावा केला. पंतप्रधानांनी वंचितच्या उमेदवाराची दखल घेतली. यावरून कोण पुढे आहे, हे सिद्ध होते असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मोदी लाट ओसरली

मोदींच्या गॅरंटीची जनताच आता खिल्ली उडवत आहे. नोटबंदी, कर्जवाढ, बेरोजगारी, सरकारी मालमत्ता विकणे हीच मोदींची गॅरंटी असल्याचे लोक म्हणत आहेत. मोदींच्या या जुमल्यांना लोकांनी आणि स्थानिक पक्षांनी उद्ध्वस्त करून टाकले आहे. पुण्यातील मोदींच्या सभेत 40 टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. यावरून मोदींची लाट ओसरली आहे, अशी टीकाही डॉ. आंबेडकर यांनी केली.

काँग्रेस कमजोर 

स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण झाला आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी बऱ्याच ठिकाणी तोडजोडीचे उमेदवार दिलेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिला. यावर नाना पटोलेंनी आनंद व्यक्त नाही केला. उलट नितीन गडकरींच्या पराभवबद्दल दुःख व्यक्त केले. यावरून छुपा समझोता उघड झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक पक्षांनीच भाजपची हवा काढली आहे. भाजप चारशेवरून तीनशे आणि आता दोनशेवर आल्याची परिस्थिती आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Property of Leaders : पाच आमदारांची संपत्ती ऐकुन धक्काच बसेल 

कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार हा खूप कमकुवत आहे. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा सामना करू शकत नाही. यावरून सर्वकाही स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेसचा सँडविच केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. अनेक काँग्रेस कार्यकर्ते ‘वंचित’बरोबर काम करत आहेत. काँग्रेसची तयारी असेल, तर विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही चर्चेला तयार आहोत, असे आंबेडकर यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!