Political war : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सध्या वेग आहे. दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, एसटी बसेसवर महायुतीकडून पोस्टर लावून प्रचार करीत असल्याची बाब वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी निर्दशनास आणली आहे.
आपल्या सोशल मीडिया एक्स अकाऊंट त्यांनी एक फोटो ट्विट करीत निवडणुक आयोगाला टॅग केला आहे. त्यांनी नाराजी व्यक्त करून निवडणूक आयोगाला प्रश्न केला आहे. वाशिम मध्ये प्रचाराला जात असताना आंबेडकर यांनी हा फोटो काढल्याची माहिती आहे.
वाशिममध्ये हे पाहिले आणि लगेच क्लिक केले. सार्वजनिक वाहतुकीवर याची परवानगी कशी आहे? असा सवाल आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
Lok Sabha Election : मुस्लिमांची मते हवी, मात्र मुस्लिम उमेदवार का नको?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने सध्या अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचाराला वेग घेतला आहे. दळणवळणाचे साधन असलेल्या वाहनांवर प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी बसेसवर प्रचाराचे पोस्टर अनेक उमेदवारांकडून लावण्यात येत आहेत. वाशिम मध्ये प्रचारासाठी गेलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी असाच एक फोटो पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. बसेसवर महायुतीच्या प्रचाराचे बॅनर लावण्यात आल्याने प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून एसटी बसेसवर प्रचार करण्याची परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न एक्सच्या माध्यमातून पोस्ट करीत उपस्थित केला आहे.
अकोला मतदारसंघात असा प्रकार यापूर्वी देखील निदर्शनास आला होता त्यावेळी एसटीच्या अधिका-यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता प्रकाश आंबेडकर यांनी तक्रार केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.