Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे आता आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी ओबीसी (OBC) नेते मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या आरक्षण बचाव यात्रेच्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना सोबत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा आम्ही कुणाला नाही म्हणत नाही. भुजबळांना यायचे असेल तर त्यांनी यावे. मुंडेंना यायचे असेल तर त्यानी यावे, हाके आणि वाघमारे यांनीही यावे. कुणालाही दरवाजे बंद नाहीत, असे आंबेडकरांनी म्हटले होत. आता भुजबळ यांच्या निमंत्रण देणााचे पत्रच प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Parliament Session : विशेष राज्याचा दर्जा नाहीच; नितीश यांच्या राजीनाम्याची मागणी
राज्यभरात फिरणार
राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर राज्यात आता एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. या आरक्षण बचाव यात्रेला 25 जुलैला दादरच्या चैत्यभूमीतून सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 किंवा 8 ऑगस्टला तारखेला यात्रेचा समारोप होणार आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमी येथुन सुरू होणार आहे. त्याच दिवशी पुण्यातील (Pune) महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी ओबीसी आंदोलकांसह, काही बड्या नेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील एकटे पडणार की काय? अशी चर्चा होत आहे. आता जरांगे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जरांगे विरुद्ध भुजबळ
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात बरेचदा वाद विकोपाला गेले आहेत. अनेकदा शाब्दिक हल्लेही दोघांनी एकमेकांवर केले आहेत. दोघांमध्ये वाक्युद्ध सुरू असते. दोघेही एकमेकांवर एकेरी भाषेत बोलत जहरी टीका करतात. अजुनही ही टाकीटिप्पणी सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसींमधून देऊ नका. त्यांना वेगळे द्या. आमचा त्याला विरोध नाही, अशी छगन भुजबळ यांची भूमिका आहे. आता मराठा समाजात सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी जरांगे माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता वातावरण आणखी तापले आहे.
काही दिवसांपूर्वीच आंबेडकर जरांगे यांना भेटले होते. जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) सर्व 288 जागा लढवाव्या असा सल्ला त्यांनी दिला होता. यापूर्वीही त्यांनी जरांगे यांना अनेकदा सल्ला दिला आहे. परंतु अचानक आंबेडकर यांच्याकडून भुजबळ यांना निमंत्रण देण्यात आल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत. आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे व त्यांनी भुजबळांना जवळ केल्याने आता जरांगे आंबेडकरांनी टीका करतात की काय, असे बोलले जाऊ लागले आहे.