महाराष्ट्र

Save Reservation : आंबेडकर पवारांना म्हणाले, ‘तुमचा पक्षच..’

Prakash Ambedkar : आरक्षण बचाव यात्रेत शरद पवार यांना खोचक टोला

Beed : राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या निमित्ताने ते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनतेने राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन ते करीत आहेत. तसेच त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आरक्षणाविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. तर मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ‘तुमचा पक्षच गुंडाळून टाका’ असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

आरक्षण बचाव यात्रा बीडमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी संवाद साधला. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील त्या भूमिकेसोबत आम्ही राहू. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता शरद पवारांनी अगोदर आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते सांगावं, असं आवाहन त्यांनी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घ्यावी असे पवार म्हणत असतील तर पवारांच्या पक्षाची गरज काय? तुमचा पक्षच गुंडाळून टाका अस म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

शेतकरी आणि वंचित तसेच सरकार विरोधी भूमिका असणाऱ्या सर्वांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग राज्यात सुरू येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी सक्रीय होईल. शेतकरी नेत राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आवाहन केले आहे. त्यावर आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांनी ठोस भूमिका मांडावी, ठोस भूमिका नसताना यावर काय बोलावं, असे आंबेडकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे काही मराठा कार्यकर्ते, मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी मंगळवारी (३० जुलै) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’वर भेटले. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी मराठा कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं की ‘केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी मी आमच्या पक्षाच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पाठवणार आहे.’ उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!