Contempt Of Constitution : परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर हिंसक उद्रेक झाला आहे. सध्या परभणीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी समता व्यक्त केला आहे. विटंबना करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी अटक केली नाही तर परिणाम भोगण्यास तयार व्हावे, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती आहे. या प्रतिकृतीची तोडफोड एका व्यक्तीकडून करण्यात आली. तोडफोड करणाऱ्या व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परभणी शहरांमध्ये तणाव निर्माण झाला होता. बुधवारी (11 डिसेंबर) या घटनेच्या विरोधात परभणी मध्ये बंद पुकारण्यात आला होता. याबद्दल हिंसक वळण लागले.
कठोर उपाय
हिंसक उद्योग झाल्यानंतर प्रशासनाने परभणीमध्ये संचारबंदी लागू केली आहे. या घटनेबद्दल माहिती पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड निषेधार्य आहे. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किंवा दलितांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या गोष्टींची तोडफोड नवीन नाही. मात्र या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते. पोलिसांनी अद्यापही यासंदर्भात गुन्हा नोंदवलेला नाही. तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला अटकही करण्यात आलेली नाही, असे आंबेडकर म्हणाले.
परभणीमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासनाने आपली कारवाई करावी. दलित समाजातील सर्वांना आपण शांतता राखण्याची आवाहन करतो. पुढील 24 तासात प्रशासनाने हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. ही कारवाई न झाल्यास प्रशासनाला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
आरोपी रुग्णालयात
संविधानाच्या प्रतिकृतीचा आव्हान करणाऱ्या व्यक्तीला लोकांनी बेदम मारहाण केली. या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला आहे. विटंबना करणारे व्यक्तीचे नाव सोपान दत्तराव पवार (वय 45) आहे. सोपान मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाने त्याला रुग्णालयात दाखल केली आहे.
परभणीतील दंगलीनंतर जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दंगल प्रकरणी आतापर्यंत 40 जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप परभणी मध्ये दाखल झाले आहेत. दंगल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असलेली त्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने देखील आपल्या अनेक बस फेऱ्या रद्द केल्या आहेत.