महाराष्ट्र

Prakash Ambedkar मविआ म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो…’

Congress : प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा एकदा आरोप : दलित, बौद्धांना विसरले

Political war : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीकास्त्र सोडण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. दलित, बौद्ध अन् अल्पसंख्याक समुदायाने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान केले. पण आता त्यांना दलित व बौद्धांचा साधा उल्लेखही करावा वाटत नाही. हिच त्यांची खरी मानसिकता आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निकालानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आपल्या एक्स या सोशल हँडल अकाउंटवरुन आरोप केले. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच एका विस्तृत ट्विटद्वारे यासंबंधीचे आरोप फेटाळले होते. वंचित भाजपची ‘बी’ टीम आहे का? या प्रश्नाचे वारंवार उत्तर देऊन आता मी थकलो आहे. हा प्रश्न प्रत्येक भारतीय मुस्लिमांना ‘तुम्ही दहशतवादाविरोधात आहात का?’ या प्रश्नाप्रमाणेच हे असल्याचे ते म्हणाले होते.

पक्ष वाचवणाऱ्यांना विसरले

प्रकाश आंबेडकरांनी आज केलेल्या एका ट्विटद्वारे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. हे तिनही पक्ष दलित, बौद्ध व इतर अल्पसंख्यक समुदायांशी ‘गरज सरो वैद्य मरो’च्या धोरणाने वागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडी नव्हे तर भाजपला मतदान केले. या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, बहुजन यांनी उबाठा शिवसेना व महाविकास आघाडीला मतदान केले. पण त्यानंतरही या पक्षांना त्यांचे पक्ष वाचवणाऱ्या दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा साधा उल्लेखही करावा वाटत नाही. हिच त्यांची खरी मानसिकता आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दलित आणि बौद्धांनी आतातरी शहाणे व्हावे. कारण, तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत, पण तुम्ही आजही त्यांच्या खिजगणतीत नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Vijay wadettivar : घोषणा फुल्ल, बत्ती गुल, तीन चाकी सरकार

भाजपचा अजेंडा उघड, काँग्रेसचा छुपा

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप व काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचाही आरोप केला होता. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. भाजप आपला अजेंडा लपवत नाही. ते उघडपणे आपल्या फुटीरतावादी अजेंड्याचा प्रचार करतात. पण काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवते. ते तोंडावर हसू आणत बहुजनांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेतात. बहुजन फसले की काँग्रेस आपले विषारी दात दाखवते. भाजप नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ आहे, असे ते म्हणाले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!