महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : रक्षा खडसेंच्या विरोधात प्रहार संघटना रस्त्यावर

Prahar appeal : खडसेंना मतदान न करता नोटा ला करा 

Mahayuti vs Prahar : रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी महायुतीत असलेल्या प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान डावलले जात आहे. असा आरोप करत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून रक्षा खडसे यांना मतदान न करता नोटाचे बटन दाबण्याचे आवाहन केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा रावेर मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपकडून पुन्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे त्यांचा सामना आता महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्याशी होणार आहे. असे असताना महायुतीचा घटक पक्ष असलेला प्रहार आणि भाजप मधील वाद समोर आला आहे. रावेर मतदारसंघात प्रहारच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना रक्षा खडसे डावलत असल्याचा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रहारचे कार्यकर्ते फिरत आहेत. असे असताना रक्षा खडसे आपल्या प्रचारात केवळ बच्चू कडू यांचा फोटो वापरतात. मात्र, रावेर मतदारसंघातील प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच आज मलकापूर येथे पत्रक काढून रक्षा खडसे यांना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. रक्षा खडसेंना मतदान न करता नोटांच बटन दाबण्याचेही आवाहन आहे.

यामुळे मात्र आता रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्या चित्र आहे. परिणामी याचा फटका उमेदवार रक्षा खडसे यांना बसतोय का? की हा वाद शमवण्यासाठी उच्च पातळीवर काही घडामोडी घडतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सासरे एकनाथ खडसे मैदानात 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांच्या विजयासाठी विविध पक्षातील समर्थकांसह रावेर तालुक्यात प्रचाराचा धुराळा लावला आहे. त्यासाठी अनेक भागात बैठका घेतल्या जात आहेत. सोबतच मतदानाची टक्केवारी वाढीसाठी प्रयत्न आणि रक्षा खडसे यांच्या पाठीमागे एकनाथ खडसे समर्थक जोडण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून सुरु आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!