महाराष्ट्र

Akola Congress : आता शिवसेनेला विधानसभेत मिळेल का साथ?

Balapur Assembly : मतदारसंघात काँग्रेसचे मतदान वाढले

Shiv Sena : लोकसभा निवडणुकीच्या निकालात अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपला कॉंग्रेसने कडवी झुंज दिली. गेल्या अनेक वर्षांनंतर काँग्रेसला चांगलं मतदान झालं. मात्र या मतदानात कॉंग्रेसबरोबरच इतर पक्षाचाही वाटा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामुळे काँग्रेसचा मतांचा टक्का वाढला आहे. मात्र येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारंपरिक मतदान शिवसेनेला मिळेल का हे पाहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तीन पक्ष लोकसभा निवडणुक लढले. लोकसभेच्या निकालात राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा जिंकता आल्या. राज्यात 48 पैकी 30 जागा या महाविकास आघाडीला जिंकता आल्या. महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. महाविकास आघाडीच्या वाढीव मतदानात आणि विजयात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा आहे.

मोलाची मदत

अकोल्यात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने बाजी मारली आहे. राज्यात शिवसेनेमुळे सर्वाधिक म्हणजेच 13 जागा मिळविणारा पक्ष काँग्रेस ठरला आहे. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसचे मतदार ठाकरे शिवसेनेला मतदान करतील का? हे पाहावे लागणार आहे.

NDA Government : शिंदेंवर दबाव टाकूनही मिळाले नाही मंत्रीपद

काँग्रेसचे मतदान वाढले

2019 मधील लोकसभा निवडणुकीत बाळापूरमध्ये तत्कालीन आमदार वंचितचे होते. असे असताना देखील ॲड. आंबेडकरांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. धोत्रेंना 80 हजार 488 मतं मिळाली. आंबेडकरांना 56 हजार 981 मते भेटली. पटेलांना 48 हजार 061 मते मिळाली होती. आताच्या निवडणुकीचा विचार केला तर बाळापूर मध्ये भाजपचे मतदान घटले आहे. धोत्रेंना येथे 63 हजार 684 इतकं मतदान मिळाले. काँग्रेसच्या मतदानात मोठी वाढ झाली आहे. पाटील यांना 73 हजार 528 एवढे वाढीव मतदान मिळाले.

वंचितच्या मतदानात किंचित वाढ झाली आहे. आंबेडकर यांना 59 हजार 130 एवढं मतदान झाले आहे. सध्या बाळापूर हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनाच या मतदारसंघावर दावा करणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना काँग्रेसची पारंपरिक मते मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. शिवसेनेच्या मदतीने बाळापूर मतदारसंघात मतांची आघाडी घेणारी काँग्रेसचा येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला किती फायदा होतो हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

अकोट, अकोला पूर्ववरही दावा

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा होईल. त्यावेळी अकोला जिल्ह्यातील बाळापूर या मतदारसंघासह अकोला पूर्व आणि अकोट या मतदारसंघावर शिवसेना दावा करण्याची शक्यता आहे. अकोट मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा गड मानला होता. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वर्चस्व होते. अकोला पूर्व हा सुद्धा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना या मतदारसंघावर दावा करणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसकडून शिवसेनेला किती मदत मिळते हे पाहावे लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!