महाराष्ट्र

Ravi Rana : विस्ताराचा पत्ता नाही, राणांच्या कार्यकर्त्यांचा ‘हेराफेरी’ सारखा उत्साह

Navneet Rana : लोकसभा निवडणुकीतही लागले होते नवनीत राणांच्या विजयाचे पोस्टर 

Amravati Politics : काही वर्षांपूर्वी बॉलीवूडचा चित्रपट हेराफेरी चांगलाच गाजला. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांनी या चित्रपटात काम केले होते. त्यावेळी हाती येणाऱ्या रकमेच्या आधीच परेश रावल अर्थात बाबूभैया याने पैसा खर्च कसा करायचा याचे प्लॅनिंग आहे करून टाकले होते. या बाबुभैयाला अक्षय कुमार त्यावेळी सल्ला देतो की, ‘खयाली पुलाव मत पकाओ.’ असाच सल्ला आता रवी राणा यांच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना देण्याची वेळ आली आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघताना मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्यात रवी राणा हे कॅबिनेट मिनिस्टर झाल्याचे पोस्टर झळकू लागले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यावेळी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रवी राणा हे सातत्याने मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करीत आहे. रवी राणा यांना स्वतःसाठी किंवा पत्नी नवनीत राणा यांच्यासाठी मंत्रिपद हवं आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या सगळ्यात रवी राणा यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आधीच त्यांच्या नावाचे बॅनर लावून टाकले आहेत.

लोकसभेत हसू

लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर वेगवेगळ्या एजन्सीने ‘एक्झिट पोल’ जाहीर केले. या सर्वेक्षणात अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा विजयी होतील असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्या अभिनंदन आमचे फलक अमरावती भर लावले होते. मात्र निवडणुकीचा निकाल आला त्यावेळी नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यामुळे युवा स्वाभिमांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना खजील व्हावे लागले. आताही असाच प्रकार युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये केला आहे.

रवी राणा यांच्या नावाने लागलेल्या या पोस्टरमुळे अमरावतीकरांची सध्या चांगलीच करमणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांच्या विजयाचे आणि अभिनंदनचे बॅनर गावभर लागले होते. मात्र झाले वेगळेच. असाच काहीसा प्रकार यावेळी देखील घडू नये म्हणजे झालं, अशी प्रतिक्रिया अमरावतीमध्ये व्यक्त होत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे जाणाऱ्या रवी राणा यांची जवळीक सध्या भारतीय जनता पार्टीशी आहे. बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना पराभूत केल्यानंतर आता राणा यांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रिपद खेचून आणायचे आहे. त्यामुळे या पदासाठी सध्या नवनीत राणा आणि रवी राणा दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

Prakash Ambedkar : कारवाईची मागणी; अन्यथा परिणामांचा इशारा 

नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत. रवी राणा यांना बडनेरा विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे एक तर नवनीत राणा यांना मंत्रिपद मिळावे किंवा स्वतःला तरी स्थान मिळावे, असा प्रयत्न रवी राणा यांच्याकडून केला जात आहे. मात्र हे सगळं ठरण्यापूर्वीच आणि मंत्र्यांची यादी फायनल होण्यापूर्वीच रवी राणा यांच्या नावाने लागलेले कॅबिनेट मिनिस्टरचे फलक चर्चेचा विषय ठरत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!