महाराष्ट्र

Independence Day : तिरंगा रॅलीत टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन वाद!

Mumbai : पोलिसांनी घेतले नमते; राजकीय वाद उफाळण्याची शक्यता

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मुंब्रा येथे हजरत टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन वाद निर्माण झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या खाजगी संघटनेच्या वतीने मुंब्र्यात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे पोस्टर झळकत होते. मात्र यामध्ये टिपू सुलतान यांचे देखील फोटो असलेले पोस्टर रॅलीमध्ये दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी या खाजगी संघटनेच्या रॅलीला थांबवून टिपू सुलतान यांचे पोस्टर असलेले फलक काढायला सांगितले. रॅलीमधील मुस्लिम समुदायाने त्यावर हरकत घेतली. पण पोलिसांनी नमते घेतल्यामुळे मोठा वाद टळला.

मुस्लीम बांधवांनी पोस्टर काढण्याचे कारण पोलिसांना विचारले. त्यावर मुंब्रा पोलिसांनी शांतता राखत कोणताही राजकीय वाद होऊ नये याची काळजी घेतली. आणि त्यानंतर ती रॅली सुरळीतपणे सोडली. परंतु, महाराष्ट्रात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिपू सुलतान या नावावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये अनेकदा वाद झालाय. टिपू सुलतान म्हैसूरचे शासक होते. टिपू सुलतान यांनी 1782 ते 1799 या काळात म्हैसूरवर राज्य केलं. टिपू सुलतान हे हिंदूविरोधी असल्याचा प्रचार करण्यात येतो. टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यावर भाजपचा आक्षेप आहे. या मुद्यावर भाजपने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव द्यायला भाजपने विरोध केला होता. आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन मुंब्र्यामध्ये नवा वाद निर्माण झाला आहे.

Manoj Jarange Patil : ‘लाडकी बहीण’ ही सावकारी योजना!

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मुंब्र्यातील सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या खाजगी संघटनेच्या वतीने मुंब्र्यात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे पोस्टर झळकत होते. मात्र यामध्ये टिपू सुलतान यांचे देखील फोटो असलेले पोस्टर झळकले. त्यामुळे पोलिसांनी या खाजगी संघटनेच्या रॅलीला थांबवून टिपू सुलतान यांचे पोस्टर असलेले फलक काढायला सांगितले. मात्र रॅलीमध्ये असणाऱ्या मुस्लिम समुदायाने पोस्टर का काढावे असा सवाल केला. त्यानंतर पोलीस हतबल झाले आणि विषय तेथेच थांबवला.

रॅलीत इतर थोर पुरुषांचेही फोटो

तिरंगा रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई यांच्यासह इतर स्वातंत्र्यसैनिकांचे देखील पोस्टर झळकले होते. मात्र पोलिसांनी टिपू सुलतान यांच्याच फोटोवर आक्षेप घेतल्यामुळे मुस्लीम बांधव नाराज झाले. पोलिसांनी हे प्रकरण शांतपणे हाताळले असले तरीही राजकीय वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!