महाराष्ट्र

Amol Mitkari : जनतेच्या मनातील ‘त्या’ शंकेला दुजोरा मिळेल !

Medha Kulkarni : महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

Maharashtra Politics : ‘आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही, असा पवित्रा मी अमोल मिटकरी यांच्याबाबत बारामतीमधील एका सभेत घेतला होता. बारामतीमधील सभेचा किस्सा सांगताना भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या विधानावर आता आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 

आमदार मिटकरी म्हणाले, मेधा कुलकर्णी यांनी माझ्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे राज्यघटना बदलण्यावरून भाजपावर जे आरोप होत आहेत, त्याला अधिकृत दुजोरा मिळेल, असं आहे. दोघांतील या वादामुळे महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभा निवडणुका संपल्या असल्या तरी राजकीय वातावरण मात्र अजूनही तापलेलेच आहे. आता महायुतीच्या घटकपक्षातील दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे.

भाजपच्या राजसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचं एक विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी हे विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरीं यांच्यासंदर्भात केलं आहे. कुलकर्णी यांनी बारामतीमधील आयोजित एका सभेचा किस्सा सांगताना भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी ‘आमदार अमोल मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते, त्या स्टेजवर मी येणार नाही, अशी भूमिका घेतल्यावर मिटकरी त्या सभेला आलेच नाही, असा किस्सा मेधा कुलकर्णी यांनी सांगितला. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणा, असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्या. यावर आता आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया देत मेधा कुलकर्णी यांच्यासह भाजपवरही टीका केली आहे.

Mahadev Jankar : महादेव जानकरांची चुकली ‘स्टेप’ !

नेमकं काय म्हणाले आमदार मिटकरी ?

मेधा कुलकर्णी यांना प्रत्युत्तर देतांना मिटकरी म्हणाले, राज्यसभा आणि लोकसभा ही दोन्ही सभागृह संविधानाच्या चौकटीत येतात. या दोन्ही सभागृहांतील सदस्याला जी शपथ दिली जाते, ती महत्वाची आहे. त्यानंतर तो कोण्या एकाचा समाजाचा राहत नाही. शपथ घेतल्यानंतर जर आपण मात्र कुणी एका आपण एका समाजपुरते आहोत, असं जर कुणी वागत असेल, तर हे भारतीय संविधानाच्या विचारधारेला छेद दिल्याचा हा प्रकार आहे.

ज्या सभेबद्दल मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं, तर त्या सभेला त्या असल्याचं माहीत पडलं, तेव्हा मीच त्या सभेला गेलो नाही, असं मिटकरी म्हणाले. कारण अशा लोकांसोबत मलाच स्टेजवर बसायचं नव्हतं. जनतेच्या मनात राज्यघटना बद्दलण्याबाबत भाजपबद्दल जी शंका आहे, त्याला अधिकृत दुजोरा मिळेल, असा दावाही मिटकरी यांनी केला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!