महाराष्ट्र

Bhandara : माजी खासदार पटलेंचे ‘नानां’शी जूळले सूत!

Shishupal Patle : काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

भाजपपासून फारकत घेतलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांचे नानांशी जवळीक वाढलेली आहे. याची परिणीति म्हणून लवकरच शिशुपाल पटले काँग्रेसवासी होणार आहेत, असे दिसते. वरिष्ठ नेत्यांकडून झालेले दुर्लक्ष आणि पक्षाकडून झालेल्या अवहेलनेमुळे भाजपमधून बाहेर पडलेले माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसच्या वाटेवर आहेत. येत्या 15 किंवा 16 ऑगस्टला ते मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

सामान्य नागरिक, शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न भाजप नेतृत्वाकडून आणि राज्य व केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सोडविले जात नसल्याचा आरोप शिशुपाल पटले यांनी महिनाभरापूर्वी पत्रकार परिषदेतून केला होता. हे प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटले नाही तर आपण पक्षातून बाहेर पडू, असा निर्वाणीचा इशाराही दिला होता. त्यांच्या इशाऱ्याची कोणतीही दखल न झाल्याने अखेर त्यांनी 24 जुलैला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

तेव्हापासून त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अटकळ बांधली जात होती. मागील वर्षभरापासून शिशुपाल पटले भाजप नेतृत्वावर नाराज होते. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नाही, अशी त्यांची खंत होती. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी एका ओळीत लिहिलेला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला. त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही आणि नेते पटले यांची समजूत काढतील, असे मानले जात होते. मात्र, तसे झाले नाही. पटले यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत भाजप नेतृत्वाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

Manoj Jarange Patil : भुजबळ म्हणजे नाशिकला लागलेली साडेसाती!

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पटले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते 15 किंवा 16 ऑगस्ट रोजी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांचे हे पाऊल भंडारा-गोंदिया परिसरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील भाजप संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पटलेंमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता

शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला असला तरी तुमसर मोहाडी विधानसभेवर त्यांचा ‘इंटरेस्ट’ सर्वश्रुत आहे. त्यामुळे ते तुमसर मोहाडीच्या उमेदवारीसाठी नाना पटोलेंकडे आग्रह धरू शकतात. पण या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट उत्सुक आहे. त्या दृष्टीने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे शिशुपाल पटले यांच्या प्रवेशाच्या बातमीने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आणि प्रवेश झाला तर वितुष्ट निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!