महाराष्ट्र

Kolkata : देशभरात रुग्णसेवा होणार विस्कळीत

Doctor's Protest : कोलकाता प्रकरणावरून आयएमए आंदोलनात; डॉक्टरांचा देशव्यापी संप

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांकडून तीव्र आंदोलन सुरू आहे. अश्यात शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे काही प्रमाणात वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. आयएमएचा देशव्यापी संप शनिवार, दि. १७ अॉगस्टला होणार आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे निवासी डॉक्टरांकडूनही आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातला खुनी संजय रॉयला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. तर दुसरीकडे आता डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनेही एक पत्रक काढून 17 ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा 17 ऑगस्टला सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.

एकजुटीने संपात उतरणार

17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 या 24 तासांत फक्त खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे. जवळपास 25 राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असले, तरी ते त्याची अंमबजावणी होताना दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Independence Day : तिरंगा रॅलीत टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन वाद!

निवास डॉक्टरांचा संप तीव्र होणार

दुसरीकडे राज्यातील मेडिकल कॉलेज आणि शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचाही सुरू असलेला संप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारे निवासी डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील हजारो निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरीही शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेला याचा मोठा फटका बसला आहे.

प्रकरण सीबीआयकडे

कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. हायकोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते. सध्या कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!