प्रशासन

Gadchiroli Election : घनदाट जंगल, नक्षल्यांचा धोका अन् त्यांची पायपीट

Polling Day : लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक पथकांचा ‘रिस्की’ प्रवास

Protection Of Democracy : अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेले घनदाट जंगल. मावळीकडे जात असलेला सूर्य. जवळपास नद्यांचे वाहणाऱ्या खळखळ पाण्याचा आवाज. रानकिड्यांना किर्रर्र.. किर्रर्र असा आवाज. आसपास असलेले वन्यप्राणी. पण त्यांच्याही पेक्षा जास्त घातक असलेल्या माओवाद्यांचा धोका, अशा परिस्थिती मंगळवारी (19 नोव्हेंबर) निवडणूक पथकं गडचिरोलीतील दुर्गमातील दुर्गम भागात दाखल झालीत. ‘बुलेट’वर विश्वास ठेवणाऱ्या माओवाद्यांना ‘बॅलेट’ची ताकद दाखविण्यासाठी गडचिरोलीतील आदिवासी सज्ज झाले आहेत. या प्रत्येक मतदाराचं मत नोंदवून घेता यावं यासाठी निवडणूक पथकं नियमाप्रमाणं एक दिवस अगोदर मतदान केंद्रांवर दाखल झाली आहे.

जवळपास संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात नद्या, डोंगर, जंगल, दुर्गम भाग आणि माओवादी असं चित्र आहे. त्यामुळं मतदान कर्मचाऱ्यांना खास वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं ‘एअर लिफ्ट’ करण्यात आलं. ठराविक अंतरापर्यंत या पथकांना वायुसेनेनं ‘ड्रॉप’ केलं. मात्र त्यानंतर अनेक किलोमीटरचा प्रवार या पथकांनी घटनाट जंगल तुडवत केला. त्यांच्या मदतीसाठी सी-60 पथकातील सशस्त्र कमांडो, सीआरपीएफ, निमलष्करी दलही होते. गडचिरोलीत माओवादी जंगलांमध्ये भूसुरूंग पेरून ठेवतात. सुरक्षा दलांना त्याचा अंदाज असतो. पण निवडणूक कर्मचाऱ्यांना या चा फारसा अंदाज येत नाही. त्यामुळं एक एक पाऊल जपून टाकत पथकांनी गावं गाठली.

धडपडीचे कारण की..

निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली दुर्गम भागातील ही धडपड फक्त संविधान अन् लोकशाहीनं दिलेल्या अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी होती. गडचिरोलीतील काही गावं तर अशी आहेत, जिथे पाच, सात, दहा, बारा, 25 इतकी कमी मतंसंख्या आहे. दोनचार मतं नाही मिळाली तर काही फरक पडणार आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु निवडणूक आयोग, निवडणूक कर्मचारी आणि गडचिरोलीत तैनात प्रत्येक कमांडो दुर्गम आदिवासी देखील लोकशाहीच्या प्रवाहात राहावे, यासाठी जीव धोक्यात घालून जंगल तुडवट सरसावले.

गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी हे ते मतदारसंघ. यापैकी अनेक भाग दुर्गम आहेत. वाहन तर सोडा चालायलाही रस्ता नाही. वीज पुरवठा नाही. मोबाइलचं नेटवर्क नाही. माओवाद्यांनी केलेला गोळीबार, भूसुरूंग स्फोट, जाळपोळ, रस्त्यांचे नुकसान, पुलांचे नुकसान अशी अनेक चिन्हं आजही त्यांच्या हैदोसाची साक्ष देतात. पण ही सगळी दहशत बाजूला ठेवत निवडणूक पथकं आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. संपूर्ण गडचिरोली जिल्हा माओवादग्रस्त आहे. माओवादी केव्हाही, कोणत्याही क्षणी सुरक्षा दलाच्या जवानांवर प्राणघातक हल्ला करू शकतात. स्फोट घडवू शकतात. त्यामुळं मतदान आटोपल्यानंतर प्रत्येक टीम सुखरूप परत येईपर्यंत अधिकाऱ्यांचा जीवही टांगणीला राहणार आहे.

Gadchiroli : दारूबंदी नको, तो उमेदवारच नको!!

जबरदस्त घेराव

आंध्र प्रदेश, छत्तीगसड हे माओवाद प्रभावित राज्य गडचिरोलीला लागून आहेत. गोदावरी, प्राणहिता नद्यांच्या खोऱ्यातून माओवादी कधीही राज्याच्या सीमा पार करतात. त्यामुळं निवडणुकीसाठी गडचिरोली पोलिसांनी जबरदस्त घेराबंदी केली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या (SAPF) शंभरावर कंपन्या तैनात करण्यात आल्या आहे. नागपूर शहर पोलिस दलातूनही मनुष्यबळ गडचिरोली पाठविण्यात आलं आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतून (MPA) मोठा ताफा गडचिरोलीत आला आहे. नागपूर शहरातील आठ रस्ता चौकाजवळ पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातूनही ताफा गडचिरोलीत तैनात करण्यात आला आहे.

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी 16 हजार सशस्त्र पोलिस बळ तैनात करण्यात आलं आहे. कमी संवेदनशील असलेल्या भागांमध्ये बाहेरून आलेल्या पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. जिथेजिथे भाग दुर्गम, घनदाट आणि माओवाद प्रभावित असेल तिथेतिथे कमांडोज आणि केंद्रीय बळ तैनात करण्यात आलं आहे. असं असलं तरी बाहेरून आलेल्या पोलिसांनाही सगळ्यात अत्याधुनिक शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सुमारे 367 मतदान केंद्र असे आहेत, जे अतिसंवेदनशी आहेत. या केंद्रांवर सीआरपीएफ तैनात आहे.

Assembly Election : घरोघरी पोहोचल्या व्होटिंग स्लीप

संवेदशील मतदान केंद्रांवर सी-60, क्विक अॅक्शन टीम, क्विक रिस्पॉन्स टीमच्या 36 तुकड्यात तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर पथकं रवाना झाल्यामुळं भारतीय वायुदलाची हेलिकॉप्टरही 24 तास सज्ज ठेवण्यात येणार आहेत. रात्री उड्डाण घेण्यासही सक्षम असलेले हेलिकॉप्टर गडचिरोलीत दाखल झाले आहेत. यात तीन एमआय-17 हेलिकॉप्टर वायुसेनेचे आहेत. भारतीय लष्कराचे दोन एएलएच देखील आहेत. गडचिरोली पोलिसांचे स्वत:चे दोन असे एकूण सात हेलिकॉप्टर सतत घिरट्या घालत राहणार आहेत.

घातक शस्त्र तयार

दुर्गम भागांसाठी 130 ड्रोन सतत आकाशात उडते ठेवण्यात येणार आहे. त्यातून माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.मतदान प्रक्रियेत माओवाद्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केलाच तर घातक शस्त्रांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी प्रसंगी ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पाच अॅन्टी ड्रोन गन सज्ज झाल्या आहेत. डिप सर्च मेटल डिटेक्टरचा वापर केला जात आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीनं आतापर्यंत सुमारे 700 टीमला ‘एअर ड्रॉप’ करण्यात आलं आहे. या सर्व बंदोबस्तावर विशेष कृती दलाचे अपर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद पूर्ण वेळ लक्ष ठेवत आहेत. गडचिरोली पोलिस अधीक्षक म्हणून काळ गाजविणारे व आता याच भागाचे आयजी असलेले संदिप पाटील देखील दाखल झालेत आहे.

Assembly Election : प्रशिक्षणाला अधिकाऱ्यांची दांडी

गडचिरोलीचे यापूर्वीचे एसपी आणि आता डीआयजी झालेले अंकित गोयल, गडचिरोलीचे एसपी नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक अहेरी श्रेणिक लोढा हे देखील पूर्णवेळ ‘ग्राऊंड’वर काम करणार आहेत. माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची मदतही घेतली जात आहे.

महाराष्ट्राच्या अन्य भागांपेक्षा गडचिरोलीतील वातावरण फारच वेगळं आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणत गडचिरोली पोलिस आणि निवडणूक विभागाच्या टीम स्वत:चा जीव धोक्यात घालत आपलं कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावत आहे, त्याचं कारण अजय देवगणच्या दिलजले या चित्रपटातील त्या गाण्यात सापडते, ज्यात तो गातो ‘मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन. शांति का, उन्नति का, प्यार का चमन. इसके वास्ते निसार हैं मेरा तन, मेरा मन.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!