Political war : मतदारांना हेलिकॉप्टर आणण्यासाठी 70 हजार कोटी त्यांच्याकडे आहे. 70 हजार कोटी रुपयांचा वापर करून मतदारांना हेलिकॉप्टरने आणणे, विकत घेणे आता राजकारणाला धंदा समजणाऱ्याची भाषा अशीच असणार. हे राजकारण समाजसेवंच व्रत आहे. परंतु काहींनी त्याला व्यवसायाचे स्वरूप दिले. राज्यातील मंत्री हसन मुश्रीफ यांचे बेताल वक्तव्य याच धाटणीतील आहे, निवडणूक आयोगाने त्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपुरात ते बोलत होते.
त्यांना संविधान बदलायचेय
संघ भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. या देशामध्ये कुठली विचारधारा नाही म्हणून त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात. त्यांना त्यात आनंद वाटतो. त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, असे वडेट्टीवार यांनी याबाबत सांगितले.
जनता आता सहन करणार नाही
त्यांना कोणी जाहगीरदार कोणी बनवलं. मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहागिरदार केला. ज्यांनी राजा केला त्याच्याच डोक्यावर पाय ठेवून राजा होणे जनता सहन करणार नाही. कोण शिवसेना वाचवते ते येणारा काळ आणि जनता ठरवेल.
सांगली संदर्भात तोडगा
टोकाची भूमिका घेऊ नये, मार्ग काढू असे नाना पटोले बोलले आहेत. संजय राऊत यांनी आघाडी धर्म पाळताना सामंजस्याने भूमिका ठेवावी असे ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्या विषयीसा क्षगंध होण्यापूर्वी पसंत केले होते. त्यांनी लग्नासाठी का नकार दिला, हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होत त्यासाठी चर्चा करायची होती..त्यांनी लग्न तोडलं असे वर्णन वडेट्टीवार यांनी वंचित सोबत वाटाघाटी संदर्भात केले.
पंतप्रधानांचा दौरा
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता टिकवण्यासाठी कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. विजय महाविकास आघाडीचा होईल, लोकं ऐकायला जातात, पण मतदान करत नाही हा अनुभव येईल.
एकनाथ खडसेंबाबत
गळ्याला फास लागला बिचारे काय करणार, संजयसिंगला फसवत बेजार केलं, या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते असे एकनाथ खडसे यांच्या घरवापसी बाबतीत म्हणाले.
राणा कडू वाद
राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. राजकारण स्वार्थी झाले आहे, राजकारण नासवल आहे, राणा कशा बचबच बोलतात. राणा कोणाच्या भरोशावर निवडून आल्या. शरद पवार या जेष्ठ नेत्याचा आशीर्वाद आणि काँग्रेसच्या मतांमुळे त्या निवडून आल्या होत्या. आता राणाची भूमिका बदलली. लोक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ज्याला वैचारिक व्यासपीठ नाही, स्वार्थी मतलबी तसेच संपत्ती वाचवण्यासाठी, केसेस काढून घेण्यासाठी कधी काय नाव घेते, देवाचे नाव घेतील उद्या रावणाचे नाव घेतील.
संजय निरुपम यांच्या विषयी
आम्ही आता काढून टाकला, आता कुठेही जाऊ द्या. चण्याच्या झाडावर जाऊ किंवा चिखलात रुतून काय करायचं ते ठरवू दे. आमचं काही देणं घेणं नाही.
विनोद तावडे चितपट
पक्ष म्हटले की मतभेद गटबाजी आली. काँग्रेस पक्षातही मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली होती. काँग्रेस आता एकसंघ आहे, ही कीड भाजपमध्ये सुरू झालेली आहे. उंदराला घुस व्हावं असं वाटतं आणि घुशीला बोका. बोक्याला वाटतं की मला त्यापेक्षा चपळ प्राणी होत येईलं का. राजकारणात एखाद्याचा काटा काढला की दुसऱ्याचा काटा काढला जातोच.. राजकारणात महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता हे काढण्यासाठी दाभन वापरतात की सुई वापरतात हे येत्या काही दिवसात कळेल असे तावडे यांच्या संदर्भात वडेट्टीवार म्हणाले.