Politics News : पुण्यातील विकासक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेतल्याची घटना नुकतीच घडली. या हिट अँड रन प्रकरणात सहभाग असलेल्या विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज न्यायालयाने आरोपी विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी, या अपघाताच्या घटनेवरून राजकीय नेत्यांमध्ये ट्वीटर वॉर सुरु झाला आहे.
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच.कोणत्याही घटनेत पोलिस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो.
मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे. म्हणजे मूळ एफआयआर दाखल करतानाची, 19 तारखेचीच कॉपी मध्ये कलम 304 त्यात आधीपासूनच आहे.त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.
त्यावर धंगेकर यांनी उत्तर देत ‘‘तरी म्हटले बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असावेत. आता तुम्हाला एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का? दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांचे अश्रू न पुसता, पुणेकरांची बाजू न घेता बिल्डर, पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात,’’ अशी टीका केली.
Prajwal Revanna : लैंगिक छळ प्रकरणी प्रज्वल रेवन्ना याचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द..
पुण्यातील काही नेत्यांची कीव येते
त्यानंतर आता पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे म्हणाले, अपघात झाला तो दुर्देवी होता. पण त्यामागून जे काही राजकारण सुरू आहे. त्यावरून पुण्यातील काही नेत्यांची कीव येते.वसंत मोरे म्हणाले, नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का? कोथरूडमध्येही नाईट लाईफबाबत लक्ष द्या असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.समाज माध्यमांवर आरोप सुरुच आहेत.