महाराष्ट्र

Maharashtra Assembly : राणा-ठाकूर यांच्या पुन्हा वाक्-युद्ध

Yashomati Thakur : जात प्रमाणपत्र खोटे असणाऱ्या लोकांनी बोलूच नये

Political Drama : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या पुन्हा वाक्-युद्ध सुरू झाले आहे. एका मिरवणुकीत नवनीत राणा यांच्या बाण मारण्याच्या कृतीबद्दल यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावरून राणा यांनी ठाकूर यांना टोमणा मारला. बाजारात चांगला ब्रान्ड असला की

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

लोक त्याची कॉपी करतातच असे राणा म्हणाल्या. राणा यांच्या या टोमण्याला आमदार यशोमती ठाकूर यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ‘कसला ब्रान्ड? राणा यांनी बाण मारण्याच्या कृतीच कॉपी केली आहे. ती कृती त्यांची स्वत:ची नाही. त्यांनी एका महिला नेत्याचे पाहून हे केले आहे. त्यामुळे त्यांनी कॉपीच्या बाबत तर अजिबात बोलू नये’, असे ठाकर म्हणाल्या.

राणा या खोटारड्या आहे. त्यांचे जातीचे प्रमाणपत्रच खोटे आहे. खोटारडे प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांनी तर खरे कोण आणि खोटे कोण यासंदर्भात भाष्यच करायला नको, असे प्रत्युत्तर त्यांनी राणांना दिले. ज्याने निवडणूकच खोट्याच्या आधारावर लढवली, त्याला जनतेने नाकारले आहे. त्यामुळे उगाच नौटंकी करण्यात काही अर्थ नाही, असे यशोमती ठाकूर यांनी नमूद केले. राणा आणि ठाकूर यांच्या पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. राणा यांचे अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेत्यांशी बिनसले आहे. त्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत सहन करावा लागला.

महायुतीतून विरोध

लोकसभेची उमेदवारी देण्यावरून महायुतीमध्ये अमरावतीत फूट पडली. त्यानंतरही सर्वांच्या नाकावर टिच्चून भाजपने राणा यांना पक्षात घेतले. उमेदवारी दिली. त्यामुळे महायुतीमधील नेते आणि विरोधक सारेच एकवटले. त्यांनी राणा यांना पराभूत करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले. राणा यांच्यासंदर्भात अमरावती मधील मतदारांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. मेळघाटातील काही गावांनी मतदानावर बहिष्कारही घातला. त्यामुळे त्याचा मोठा धक्का राणा यांना बसला.

आघाडीत एकजूट

महाविकास आघाडीत राणांविरोधात एकजूट झाली. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने देखील उमेदवार उभा केला. त्यामुळे अमरावतीत मतांचे विभाजन झाले. अशात राणा यांचा पराभव झाला. राणा यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु त्यांना त्यात अपयशच झाले.

Maharashtra Assembly : नेहमीप्रमाणे पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने-सामने

अनेक नेत्यांनी त्यांना मदतीच्या वेळी दिल्लीतील नव्हे तर गल्लीतील नेतेच कामाला येतात, असा इशाराही देऊन ठेवला होता. पराभव झाल्यानंतरही राणा यांचे स्थानिक नेत्यांशी होणारे वाद वाढतच आहे. त्याचा परिणाम काय होतो, यासंदर्भातील चर्चा आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!