संपादकीय

Lok Sabha Election : राजकीय समीकरण बदलले अन् धनुष्यबाणाच्या जागी कमळ आले

Political Game : 1989 च्या निवडणुकीत अकोला मतदारसंघात बदललेले कथित चित्र

Bjp vs Shivsena : शिवसेनेचा विस्तार या भागात होऊ लागला होता. भाजप शिवसेना युती देखील अस्तित्वात आली होती. 1989 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अकोल्याची जागा हवी होती. परंतु प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेबांचे मन वळवून ही जागा भाजपसाठी मिळवली. पुढे भाजपने विजयात सातत्य राखले. 

गुलाबराव गावंडे यांच्या नावाची चर्चा

या भागात शिवसेनेचा विस्तार करण्यात माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत अकोल्याच्या जागेवर शिवसेनेचा डोळा होता. त्यापूर्वी 1984 ची निवडणूक भाजपचे पांडुरंग फुंडकर लढले होते. परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र, अकोल्याची जागा भाजप लढणार यासाठी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची शिष्टाई यशस्वी झाली. गावंडे यांच्या ऐवजी फुंडकर यांना तिकीट मिळाले. ते विजयी झाले.

या निवडणुकीत फुंडकर कॉंग्रेसचे अझहर हुसेन यांचा पराभव करून निवडून आले. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर राहिले होते. गुलाबराव गावंडे यांना वाशीम मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. त्यांना अवघ्या सहा हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. परंतु अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे स्थान भक्कम करण्यात नंतर त्याचा खूप फायदा झाला.

Lok Sabha Election : आदिवासी, दलित वस्तीमध्ये एकनाथ खडसे गेलेत कारण…

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धुरंधर राजकीय नेते होऊन गेले. राजकीय परिस्थितीचा अचूक वेध घेण्यात हे नेते वाकबगार होते. वेळीच अचूक खेळी खेळण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नसे. आपला पक्ष फुलवण्यात आणि रूजवण्यात या नेत्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, सुधाकरराव नाईक, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, विलासराव देशमुख, नितीन गडकरी यांचा उल्लेख करावा लागतो.

ज्यांच्या मुत्सद्दी राजकारणाने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली. निवडणुकीमध्ये कोणती भूमिका फायदेशीर ठरू शकते याचा अचूक वेध घेण्यात ते निष्णात होते. आज तरुण नेते देखील तोच कित्ता गिरवताना दिसतात.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!