महाराष्ट्र

Bhandara Politics : मुंबईतील नेते नेतेमंडळी गावखेड्यात

Assembly Election : दौरे कमी करत भेटीगाठीवर भर

Vidhan Sabha : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तसे मतदारांचे महत्त्व वाढत आहे. याचा प्रत्येय सध्या येत आहे. गरजू मतदाराने एरवी भ्रमणदूरध्वनीवरुन संपर्क साधत एखाद्या कामासाठी ‘साहेब कुठं आहात’ असे विचारले तर, ‘मी मुंबईत आहे’ असे उत्तर नेत्यांकडून मिळत. ‘साहेब… एक काम होतं’ अशा विनंतीपर सुरात मतदार बोलला तर, ‘मी मंत्रालयात आहे, थोड्या वेळाने फोन करा’, असे उत्तर येऊन लगेच फोन कट केला जायचा. मुंबईचे नाव सांगत अनेक नेत्यांचे फोन ‘स्वीच ऑफ’ राहायचे. मर्जीतील व्यक्तीकडेच स्पेशल नंबर असायचा. ज्यावर साहेब नेहमी बोलून प्रचलित नंबर बंद ठेवायचे किंवा त्याला प्रतिसाद देत नव्हते.

आचारसंहितेची वेळ

आता आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते राज्याची राजधानी मुंबईचे (Mumbai) दौरे कमी करुन ‘गावखेड्यात’ मतदारांशी संवाद साधण्यावर भर देत आहेत. नेत्यांचे प्रचलित मोबाइल नंबरचे फोन सुरू झाल्याचा प्रत्यय येत आहे. स्थानिक नेते स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी गावखेड्यावर पूर्णवेळ देत आहेत. नेत्यांच्या मतदारांच्या भेटीचा विषय चर्चेचा ठरत आहे. निवडणूक कोणतीही का असेना, ती राजकीय भवितव्य ठरविणारी असते. ज्याला राजकीय ‘भविष्य’ घडवायचे आहे, त्यांचा तर’अभी नहीं तो कभी नहीं’चा नारा सुरू आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींना तर ‘नेतृत्वा’चा ‘मोह’ सुटता सुटेना असे चित्र आहे. त्याची प्रचिती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे.

रेकॉर्डची इच्छा 

विद्यमान आमदार आपल्या हॅट्ट्रिकसाठी, काही जण राजकीय पुनर्वसनासाठी तर इतर काही आपल्या राजकारणाची ‘नाव’ विधानसभेच्या किनारी लावण्यासाठी धडपडत आहेत. याच धडपडीचा एक भाग म्हणून राज्याची राजधानीमध्ये आठवड्यातील किमान आठ दिवस रमणारे स्थानिक नेते आता विधानसभेच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागाकडे वळले आहेत. राज्याची राजधानी मुंबईचे दौरे कमी करून त्यांनी आपापल्या मतदारसंघात गावभेटी अन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर देणे सुरू केले आहे.

Assembly Election : आचारसंहितेची धास्ती; प्रशासकीय लगबग वाढली

आता काही उपाय नाहीच..

नागरिकांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले जात आहेत. ते सोडविण्यासाठी आपणच भविष्यातील ‘मुख्यमंत्री’ असे ठोस आश्वासनही दिले जात आहेत. मतदारांच्या प्रश्नावर काहीजण तेथूनच आपल्या भ्रमणदूरध्वनीवरुन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करुन सूचना करीत आहेत. ‘मतदार खुश तर आपले भले’ असेच एकूण त्यांचे राजकीय सूत्र सध्या बनले आहे. नेते मंडळीच्या गावखेड्यावरील दौऱ्यांमुळे ग्रामीण भागात राजकीय ‘ज्वर’ चढू लागलेला आहे. गावच्या पान टपरीवरही नागरीकांत नेत्यांच्या या दौऱ्यांच्या चर्चा रंगू लागली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!