महाराष्ट्र

Rohit Pawar : पोलिसांनी अडविल्यानंतर कुसडगावात तणाव

SRPF Center : कर्जत-जामखेडच्या पोलिस केंद्र लोकार्पणाचा वाद

NCP Politics : कर्जत-जामखेड येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या केंद्र (SRPF) लोकार्पणावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविल्यानंतर कुसडगावमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथल्या कुसडगाव येथे एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण होणार आहे. आमदार रोहित पवार यांनी हे केंद्र मंजूर करून आणल्याचा दावा आहे. केंद्राचे लोकार्पण माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्राच्या परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

बंदोबस्त तैनात केल्यानंतर आमदार पवार यांचे समर्थक येथे पोहोचले. त्यांना पोलिसांनी अडविले. त्यामुळे आक्रमक झालेल्या रोहित पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्राच्या बाहेरच ठिय्या मांडला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आमदार राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कुसडगाव येथील एसआरपीएफ अर्थात राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र झाले आहे.

परवानगी नाकारली

केंद्राचा लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार यांनी आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख व अनिल परब (Anil Parab) यांना बोलावण्यात आले होते. मात्र त्याला एसआरपीएफ प्रशासनाने परवानगी नाकारली. केंद्राचे काम अद्याप शंभर टक्के पूर्ण झाले नसल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात आले. राज्यात मुलींवर खुलेआम अत्याचार होतात. दिवसाढवळ्या खून होतात. कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले. तिकडे लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही. मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या केंद्राची पाहणी करु न देण्यासाठी असा पोलिसांचा बंदोबस्त लावला जातोय, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

Collector : जिल्हाधिकाऱ्यांचे दौरे ठरले भावी सभापतींच्या स्वप्नातील अडसर !

महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी हे एसआरपीएफ केंद्र पुन्हा कुसडगावला दिले. हे केंद्र कुसडगावातून काढण्यात आले होते. परिवहन मंत्री असताना अनिल परब यांनी 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्जत एसटी डेपो मंजूर केला. त्यांना अडविण्यासाठी सरकारकडून बॅरिकेट्स आणि 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. हे कारस्थान एका अहंकारी स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर सरकार करीत असल्याची टीका आमदार पवारांनी केली. कुसडगावचे केंद्र वरणगावला पुन्हा स्थानांतरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला. कटकारस्थान करणाऱ्या सरकारला मतदार धडर शिकवतील, असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!