Devendra Fadnvis : आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. मोदीजींची पहिली सभा चंद्रपूर मध्ये झाली. प्रचंड उत्साह होता. चंद्रपूर मध्ये मोदीजींच्या सभेने सगळे वातावरण बदललेले आहे. मोदीजींच्या सभेमुळे अधिक मोठ्या विजयामध्ये परिवर्तन होईल, यात शंका नाही. 10 तारखेला रामटेक मध्ये सुद्धा सभा होत आहे. त्यातून विदर्भाचा भाग पूर्ण ढवळून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनसे युतीबाबत सूचक वक्तव्य
मनसे सोबत गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा झालेली आहे. मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आमची जवळीक वाढलेली आहे. राज ठाकरे असे पहिले व्यक्ती आहे की ज्यांनी 2014 मध्ये मोदीजींचं एंडॉसमेंट केलं होतं. त्यांनी जाहीरपणे भूमिका घेत मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजे असे सांगितले होते. मधल्या काळात त्यांची भूमिका नक्कीच बदलली होती. आज राज ठाकरे यांनाही मान्य असेल मागील दहा वर्षात ज्या पद्धतीने नवीन भारताची निर्मिती झाली. सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत अशा सगळ्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. अशा लोकांनी मोदीजींसोबत राहिल पाहिजे. मला विश्वास आहे राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुती सोबत राहील, मोदीजीं सोबत राहील. अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय त्यांना घ्यायचा आहे. माझी ही अपेक्षा आहे त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे.
महायुती जागा वाटप
ज्या काही उर्वरित जागा आहे त्याची एकत्रित घोषणा करणार आहोत तसेच आता प्रचाराला लागलेच पाहिजे असा निर्धार फडणवीस यांनी बोलून दाखवला. सगळ्या मित्र पक्षांनी आता तयारी केली पाहिजे असे आम्ही ठरवले आहे. किंबहुना प्रत्येक मतदारसंघात मेळावे घ्या असेही आम्ही ठरवलं आहे. त्याचा महायुतीच्या उमेदवारांना लाभ होईल.
एकनाथ खडसेंबाबत
भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल त्याचे आम्ही स्वागत करू. अजून अधिकृतरित्या कळवलेलं नाही, मात्र, ज्यावेळेस निर्णय होईल तेव्हा त्यांचे आम्ही स्वागतच करू.
शरद पवार यांच्या विषयी
शरद पवार यांच्या विषयी काय बोलू ते तिथे उमेदवार नाहीत. पण मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे सुनित्राताई पवार निवडून आल्या तर मोदीजीं करीता त्या हात उंच करतील. सुप्रियाताई निवडून आल्या तर राहुल गांधींसाठी हात वर करतील. सुनेत्राताईंना दिलेले मत हे मोदीजींना दिलेले मत आहे. आणि सुप्रियाताईंना दिलेले मध्ये राहुल गांधींसाठी आहे. आता काही लोकांना समजून घ्यायचं नाहीये तर मी त्याला काहीच करू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.