Lok Sabha Election : जागतिक स्तरावरचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच सभा व्हावी ही सर्वत्र मागणी आहे. विदर्भात त्यांच्या सभा होत आहेत त्याचा प्रभाव फक्त रामटेक मतदारसंघा पुरता नसून संपूर्ण विदर्भात होणार आहे, ही दुसरी सभा आहे. पार्टीच्या बाहेर सुद्धा त्यांना मानणारे लोक आहेत. त्यांच्याकडे आकर्षित होणारे मतदार आहेत. त्यांच्या सभेनंतर आणखी आकर्षक असं वातावरण होईल.
पुढच्या टप्प्यात मराठवाड्यात मतदान आहे तेव्हा तिकडेही सभा मिळतील असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
नाना पटोले यांच्या अपघाताबाबत
अपघात रोज होत असतात, अपघात होणं गंभीर बाब आहे. मात्र तो घातपातामुळे झाला किंवा करवण्यात आला हा निष्कर्ष आरोप करणा-यांनी कुठल्या आधारावर काढला हा प्रश्न आहे.,आणि त्याचे भाजपकडे संशयाने पाहणे हास्यास्पद आहे. घातपात म्हणायचं असेल तर त्याचा काही पुरावा आहे का असा प्रश्न त्यांनी केला. यातून प्रसिद्धी मिळावी हा प्रयत्न असू शकतो. अपघात होणं वेगळं आणि घातपात वेगळा असतो असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंबा
राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या सभांना मोठी उपस्थिती असते. त्यांची रोखठोक शैली आहे. ते महायुतीला समर्थन देत आहे तर त्याचा फायदा नक्कीच होईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
संजय निरुपम यांच्या बाबत
संजय निरुपम सारखा चांगला नेता त्यांनी गमावला. चांगला नेता पार्टी सोडून जातो याचा विचार पार्टीने करायला पाहिजे, त्याऐवजी आम्ही त्यांना काढलं वगैरे सांगणं हे काही योग्य नाही. संजय निरुपम सारखा चांगला नेता नाराज होतो आणि पार्टी सोडतो त्यामुळे लोक त्याच्याबद्दल विचार करतात. काँग्रेस कडून जे सांगितले जात आहे ते योग्य नाही काँग्रेससाठी हा मोठा सेटबॅक आहे.
Lok Sabha Election : भाजपचे ‘ते’ स्वप्न शिंदे सेनेने केले पूर्ण !
काँग्रेसमध्ये गटबाजीला उत
काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पार्टीला फक्त 17 जागांवर थांबावं लागलं याचा विचार केला पाहिजे. काँग्रेसमध्ये गटबाजी वाढलेली आहे. मी जाण्याने काँग्रेसला फरक पडला किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. मी स्वतःला मोठा नेता समजत नाही. ज्याप्रमाणे राज्याचे नेतृत्व काँग्रेसमध्ये निर्णय घेत होते ते सेल्फ डिसिजन होते त्यामुळे पार्टीतून निघालो असे अशोक चव्हाण म्हणाले.
एवढी वाईट अवस्था काँग्रेसची कधीच नव्हती असे सांगून चव्हाण म्हणाले, काँग्रेसचे नेते प्रभावीपणे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासमोर आपली भूमिका मांडू शकत नाही त्यामुळे जागा गमावून बसले आहे. सगळ्याच जागा निवडून येऊ शकत नाही मात्र ज्या येऊ शकतात त्या गमावण्याची वेळ आली आहे.
नांदेडमध्ये महायुतीच जिंकेल
नांदेडमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी होईल. मी गेल्यानंतर चव्हाण नावाचा उमेदवार असला तरी चव्हाण चव्हाण यांच्यात फरक असतो असा सूचक इशारा दिला.