Lakhpati Didi : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव खानदेश येथुन मोदींनी लखपती दिदींशी संवाद साधला. मोदी यांनी मोदी नवीन 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचे वाटप केले. वर्षाला एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या लखपती दीदींशीही त्यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातातील मृतांना श्रद्धाजंली वाहिली.
आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, जळगावमध्ये महिलांचा महासागर दिसत आहे. बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील बहिणींना मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्राचे संस्कार हे विश्वभरात पसरले आहेत. पोलंडमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. जळगाव ही संत मुक्ताइची भूमी आहे. त्यामुळे सर्व महिलांमध्ये राजमाता जिजाऊंची आणि सावित्रीबाई फुलेंची छाप दिसते. दोन महिन्यात 11 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. मोदी सरकारने महिलांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.
तुलना करण्याचे आवाहन
आधीच्या सरकारचे 70 वर्षे एका तराजूच्या एकीकडे ठेवा आणि आपल्या सरकारने केलेली कामे तराजूच्या दुसऱ्या बाजूला ठेवा. त्यानंतर तुलना करा. आपल्या सरकाच्या काळातील कामे आतापर्यंतच्या एकाही सरकारने केली नाही. विशेषत: महिलांच्या हिताची कामे कुणी, केली नाही, असे मोदी म्हणाले. यापूर्वी महिलांना पहिले कर्ज मिळत नव्हते. पण आता तशी परिस्थिती नाही. महिलांना कर्जपुरवठा करू नका असे अनेक जण सांगत होते. सरकारचे पैसे बुडतील असे सांगितले जायचे. परंतु मला माता-भगिनींवर विश्वास आहे. त्यामुळे आपण महिलांना 20 लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज देणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.
Assembly Elections : जरांगेची पार्टी सर्वात भारी; 800 इच्छुकांचे अर्ज
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यावेळी म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा महिलांना सक्षम करण्याचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण मातृशक्तीची साथ गरजेची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी झाल्या आहेत. जळगाव सोन्याची भूमी आहे. माझ्या बहिणी सोन्यापेक्षा सरस आहेत. महायुती सरकारकडून महिलांना तीन सिलिंडर मोफत देण्यात येत आहे. मोदी सरकारच्या काळात 10 कोटी महिला स्वावलंबी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात. महिला अर्थव्यवस्थेचा मुख्य धारेत आल्या तरच विकास होऊ शकतो. मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. देशातील 3 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.