महाराष्ट्र

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा विदर्भवारी

Assembly Election : बंजारा समाजासाठी करणार दौरा

To Attract Votes : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीला (Mahayuti) फटका बसलेल्या विदर्भावर नरेंद्र मोदी यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीला देखील ते भेट देणार आहेत. 

विदर्भ टारगेट

नुकतीच लोकसभेची निवडणूक संपली. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले. मात्र महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. विदर्भात महायुतीची झालेली पीछेहाट यामुळे महायुतीसह भाजप मधील अनेक बॅकफूटवर आले आहेत. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. झालेल्या काही सर्व्हेवरून राज्यात महाविकास आघाडीला बहुमत दाखवत आहे. महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

ताकद पणाला 

भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून राज्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा दौरा झाला. दोन दिवस त्यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकसत्र घेतले. आगामी विधानसभा निवडणुकीवर मंथन झाले आहे. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा होऊ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांच्याकडून खास विदर्भावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वाशिम जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मोदी पोहरादेवीला भेट देणार आहेत. पोहरादेवी येथे असलेल्या नंगारा वास्तु संग्रहालयाचं लोकार्पण यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नंगारा वास्तु संग्रहालय बंजारा समाजाची संस्कृती देवाणघेवाण करण्यासाठी आणि बंजारा समाजाचा विकास म्हणून ओळखला जाणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील काही महत्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Narendra Modi At Ramtek : मोदींनी मीडियाला दिला पैसे वाचवायचा फॉर्म्युला !

बंजारा ‘फॅक्टर’

राज्यातील काही भागात बंजारा समाजाचे अधिक मतदार आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात बंजारा समाजाचे निर्णयाक मतदान आहे. राज्यात इतरही ठिकाणी मोठं बंजारा मतदान आहे. पोहरादेवीला बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख आहे. पोहरादेवी येथे देशभरातील बंजारा समाज बांधव येतात. त्यामुळे निवडणूकीपूर्वी बंजारा समाजाच्या काशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यातून ते बंजारा मतदारांना आकर्षित करणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!