महाराष्ट्र

Narendra Modi : भर सभेत मोदींचे ‘अनुप’प्रेम; आपुलकीतून जवळ केले ‘आकाश’

Anup Dhotre : तरुण खासदारावर शाबासकीची थाप; आमदाराचा हातात हात

Akola Lok Sabha : अकोला जिल्ह्यामध्ये भाजपच्या रोपट्याचं वटवृक्ष करणारे माजी खासदार संजय धोत्रे यांच्या जागी भाजपने त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना संधी दिली. अनुप धोत्रे यांनी या संधीचं आता सोनं करण्यास सुरुवात केली आहे. अकोल्याचे खासदार झाल्यानंतर अनुप धोत्रे यांनी दिल्लीतील नेत्यांच्या भेटीसाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्यासाठी काहीतरी करावं, ही त्यांची धडपड दिसत आहे. रेल्वेमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री अशा अनेकांच्या भेटीगाठी अनुप धोत्रे घेत आहेत. त्याचा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतही गेला आहे. त्यामुळेच शनिवारी (9 नोव्हेंबर) मोदी जेव्हा अकोल्यात आले त्यावेळी त्यांचे ‘अनुप’प्रेम दिसून आले. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील महायुतीच्या जाहीर सभेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. त्यावेळी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. आपले मनोगतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. स्वागत करायला आलेल्या अनुप धोत्रे यांना एखादा वडीलधारी व्यक्ती थट्टा मस्करीने डोक्यावर जशी थाप मारतो, तशी थाप नरेंद्र मोदी यांनी मारली. त्यानंतर मात्र मोदी यांनी जे केले त्यामुळे अनुप धोत्रे यांचे सर्वत्र कौतुक झाले.

अनेकदा शाबासकी 

स्वागत स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुप धोत्रे यांच्या डोक्यावर एक टपली मारली. त्यानंतर मोदी हसले आणि त्यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठीवर अनेक वेळा शाबासकीची थाप दिली. तुम्ही खूप चांगलं काम करीत आहात. असंच काम सुरू ठेवा. आपल्या कामाचं बक्षीस आपल्याला जनता आणि पक्ष देत असतो, असा संदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शाबासकीच्या थापेतून खासदार अनुप धोत्रे यांना दिला. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही मोजक्याच नेत्यांशी दिलखुलासपणे भेटले, बोलले आणि हसलेही.

अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा यात समावेश होता. पश्चिम विदर्भामध्ये भाजपला मोठे करण्यासाठी माजी खासदार संजय धोत्रे, अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा आणि अकोल्याचे माजी खासदार पांडुरंग फुंडकर यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे भाजपच्या रोपट्याचं पश्चिम विदर्भामध्ये वटवृक्ष झालं. ही बाब ठाऊक असल्याने नरेंद्र मोदी यांनी जशी शाबासकी अनुप धोत्रे यांना दिली, अगदी तशीच आपुलकी दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या मुलाप्रतिही दर्शविली.

Ajit Pawar : पुण्याची थंडी, राजकीय गर्मी अन् दादांची ‘चाय की चुस्की’

काय झालं नेमके!

खामगाव चे विद्यमान आमदार आकाश फुंडकर हे पुन्हा निवडणूक लढत आहेत. मोदी यांनी त्यांना जवळ घेतले. त्यांचा हात हातात घेतला आणि दुसऱ्या बाजूने बाळापूरचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना सोबत घेतले. त्यानंतर सगळ्यांनी हात उंचावत जनतेला अभिवादन केले. त्यामुळे एक वडीलधारी व्यक्ती म्हणून जशी माया नरेंद्र मोदी यांनी अनुप धोत्रे यांच्या प्रति दाखवली, अगदी तसेच प्रेम त्यांनी आकाश फुंडकर यांच्याबद्दल दाखवल्याची चर्चा भाजपचा राजकीय वर्तुळात आहे. अकोल्यातील आपल्या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी उमेदवारांबद्दल जास्त काही बोलणे टाळले. परंतु आपल्या प्रत्येक कृतीमधून त्यांनी मतदारांना योग्य तो संदेश दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपण स्वतः कोणाच्या पाठीशी आहोत, हे एकूणच कृतीतून दाखवून दिले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!