महाराष्ट्र

Lok Sabha Election : मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींचा खास संदेश !

Varanasi : वाराणसीतून तिसऱ्यांदा लढवणार निवडणूक

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात वाराणसी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे, जेथून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री राजकुमार सिंग आणि अनुराग ठाकूर रिंगणात आहेत. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी शनिवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करून मतदारांना खास संदेश दिला आहे. लोकशाहीच्या या महान उत्सवात पंतप्रधान मोदींनी मतदारांसोबत उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी तरुण आणि महिला मतदार विक्रमी मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन

पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले, ‘लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. मी या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याची विनंती करतो. मला विश्वास आहे की, आमचे तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने पुढे येऊन मतदान करतील. आपण मिळून आपल्या लोकशाहीला अधिक चैतन्यशील बनवूया.’

Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचा अंतिम महासंग्राम !

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत आणि आज त्यांच्या लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळपासून कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये 45 तास ध्यान करत आहेत. सातव्या टप्प्यात केंद्रशासित प्रदेश चंदीगड, पंजाबमधील सर्व 13 लोकसभा, हिमाचल प्रदेशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6 आणि झारखंडमधील 3 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.

ओडिशाच्या उर्वरित 42 विधानसभा जागांसाठी आणि हिमाचल प्रदेशच्या सहा विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकाही एकाच वेळी होणार आहेत. सातव्या टप्प्यात जवळपास 5.24 कोटी पुरुष, 4.82 कोटी महिला आणि 3574 हजार तृतीयपंथीसह एकुण 10.06 कोटी लोक आज मतदान करण्यासाठी पात्र आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!