महाराष्ट्र

PM Modi Oath Ceremony : रक्षा खडसेंना मंत्रीपदाची ‘लॉटरी’?

Narendra Modi Government : दिल्लीवारीने वाढविली उत्सुकता

NDA : लोकसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीविरुद्ध वातावरण पाहण्यास मिळाले असताना देखील उत्तर महाराष्ट्रात महायुतीने आपला गड कायम राखला आहे. जळगाव आणि रावेर मतदार संघातून भाजपचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. खासदाररक्षा खडसे यांनी लोकसभेत हॅटट्रिक साधल्याने मराठा महिला चेहरा म्हणून त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जळगावच्या खासदार स्मिता वाघ आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे या दोघीही दिल्लीला रवाना झालेल्या असून कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याचीच उत्सुकता लागली आहे.

देशात एनडीए आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने, एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी खान्देशादून मंत्रीपदाची संधी मिळालेल्या भारती पवार, सुभाष भामरे यांचा पराभव खासदारकीची हॅटट्रीक साधणाऱ्या रक्षा खडसेंच्या पथ्थ्यावर पडून त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात ‘मंत्री’ पदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशभरातील सर्व खासदारांना दिल्लीत बोलविण्यात आले असून, गुरुवारी भाजपच्या दोन्ही नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ व रक्षा खडसे दिल्लीला रवाना झाल्या. उद्या ९ जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना दिल्लीला बोलावून घेतले आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांपैकी केवळ जळगावातील दोन जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप-महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील महायुतीला मोठा फटका बसला आहे. भाजपला राज्यात फटका बसला असला तरी जळगाव जिल्ह्यात भाजपने आपला गड कायम राखला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप-महायुतीच्या ८ पैकी केवळ २ जागा जळगावात निवडून आल्या आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.

Narendra Modi : ‘रामा’च्या पराजयाची ‘लक्ष्मणा’ने स्विकारली जवाबदारी !

माजी मंत्र्यांच्या पराभवाने आशा पल्लवित

लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या माजी खासदार डॉ.भारती पवार आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ.सुभाष भामरे यांचा पराभव झाला. उत्तर महाराष्ट्रातील दोन्ही आजी-माजी मंत्री पराभूत झाल्याने जळगावच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे तर जळगावातून उमेदवारी बदलल्यावर देखील स्मिता वाघ यांनी गड राखला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा गड राखल्याने जळगावला संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!