महाराष्ट्र

PM Modi Oath Ceremony : प्रफुल पटेल उद्या घेणार मंत्रि‍पदाची शपथ !

Prafull Patel : विधानसभा निवडणुकीमध्ये याचा निश्चित फायदा होईल.

Vidarbha Politics : काकांना सोडून पुतण्याच्या गटात जाणे अनेकांना महागात पडले. पण भंडारा-गोंदियाचे हेवीवेट नेते राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना मात्र चांगलेच फायद्याचे ठरल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये प्रफुल पटेल यांनी केंद्रीय मंत्रिपदाची माळ गळ्यात माळ पाडून घेतली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मोदी सरकारच्या शपथविधीला प्रफुल पटेल केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

उद्या (ता. 9) मोदी सरकारचा पदग्रहण सोहळा आहे. या सोहळ्यात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची पदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच उद्याच्या शपथविधी सोहळ्यात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाप्रमाणे शिंदे शिवसेनेच्या गटाला एक-एक कॅबिनेट मंत्रिपद वाटयाला येणार आहे.

 

दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव यांची नावे मंत्रि‍पदासाठी चर्चेत आहेत. आज (ता. 8) उशिरा रात्री शिंदे गटाकडूनही त्यांच्या वाटेला आलेल्या मंत्रिमंडळाचा दावेदार ठरणार आहे.

तिसऱ्यांदा मंत्रीपद..

राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या नशिबी तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळवण्याचा मान आला आहे. यापूर्वी अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग मंत्री त्यानंतर नागरिक उड्डयन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) केन्द्रातील मंत्रीपदे त्यांना मिळाली आहेत.आता मोदी सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री होता येणार आहे. त्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये उस्ताहाचे वातावरण आहे.

Bhandara Police : भंडाऱ्याचा ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची गृह खात्याद्वारे चौकशी?..

भंडारा-गोंदियात उत्साह..

ही वार्ता भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरताच अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पटेल यांच्या रुपात मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्यात गट अधिक मजबूत होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा निश्चित फायदा होईल, असे अजित पवार गटातील नेत्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढायचा आहे. त्या दृष्टीने पटेल यांचे मंत्रीपद महत्वाचे मानले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!