Nagpur Constituency : आमच्या कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी आमच्या जवळ पैसे नाहीत. परंतु जनतेचा विश्वास संपादन केला असल्याने जनतेच्या मदतीने ही निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला यांनी येथे व्यक्त केला. त्यांच्या बोलण्यात आशावाद डोकावत होता.
चेनीथला म्हणाले, केवळ पैशाच्या बळावर नाही तर विश्वासाच्या ताकदीवर निवडणुका जिंकता येतात हे आम्हांला दाखवून द्यायचे आहे. तसेच महाराष्ट्रातम महाविकास आघाडी सर्वाधिक जागा प्राप्त करेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत असे ते म्हणाले.
राहुल गांधीजींनी भारत जोडी यात्रे दरम्यान लोकांना वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी, सर्वांना न्याय देण्यासाठी तसेच देशात इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. यशाची खात्री आहे.
Lok Sabha Election : वंचित सोबत चर्चेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत तयार
नागपूर लोकसभा मतदारसंघात विकास ठाकरे हे आमचे सर्वात चांगले उमेदवार आहेत, जिंकणारे उमेदवार आहेत असे रमेश चेनीथला यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करत असताना जागा एकमेकांना शेअर कराव्या लागतात. आमचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे. भाजपला हरवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी प्रत्येक उमेदवार महत्त्वाचा आहे. त्यामुळे वर्धा किंवा विशिष्ट मतदारसंघा विषयी नाही तर सर्व मतदारसंघात यशाचे गणित बसवावे लागणार आहे.
महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमचा उमेदवार आहे. आमचे लक्ष प्रत्येक मतदारसंघाकडे आहे. भाजपला पराभवाची भिती दिसते. पंतप्रधान मोदींना देखील देशाचा कल दिसतो आहे. तर लोकांना आमच्या कडून अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही पुढे जात आहोत.
सांगलीचा विषय सुटेल….
सांगलीचा विषय आज सुटून जाईल, आघाडी असताना प्रत्येक पक्ष हा दावा करत असतो, आज किंवा उद्या सांगलीचा विषय सुटलेला असेल असे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथला यांनी सांगितले.