महाराष्ट्र

Jaideep Kawade : विटंबना करताना आव्हाडांची बुद्धी शेण खायला गेली होती का ? 

People's Republican Party : सरकारने आव्हाडांना तात्काळ अटक करावी 

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची कृती निषेधार्ह आहे. काँग्रेसी विचारसरणीचा अवलंब करणारे शरद पवार यांनी गेली अनेक दशके आंबेडकरवादाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विरोध केला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आव्हाड यांची मजल डॉ.बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना करण्यापर्यंत गेली. त्यामुळे आव्हाड यांना अटक करा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली. विटंबना करताना त्यांची बुद्धी शेण खायला गेली होती का, असा सवालही केला. 

माध्यमात नेहमी ज्ञान पाजळवणारे आव्हाड हे उत्कृष्ट कलाकार म्हणून प्रकाश झोतात येण्याचा प्रयत्न करीत असतात. एकीकडे महामानवाचे अनुयायी असल्याचा बुरखा घालून आंदोलन करायचे आणि दुसरीकडे फोटोची विंटबना करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम आव्हाडांनी केले. महाड आंदोलनात विटंबना करताना आव्हाडांनी बुद्धी गहाण ठेवली होती का? असा सवाल करीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी महाराष्ट्र सरकारने आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

सीताबर्डी, आनंद नगर येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात आव्हाडांचे पोस्टर जाळून व जोडे मारून आंदोलन करण्यात आले. पीरिपातर्फे आव्हाडांच्या गैरकृत्याचा तीव्र निषेध नोंदवितांना जयदीप कवाडे बोलत होते. आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, नागपूर शहर अध्यक्ष कैलास बोम्बले, जेष्ठ नेते अजय चव्हाण, भीमराव कळमकर, रवी बाणमारे, पलाश थवरे, हिमांशु मेंढे, सुमीत डोंगरे, डेनी सोमकुवर, गौरव जवदवार, सनी कन्ना, आयुष दाहिवले, प्रजोत कांबळे, दिलीप पाटील, विनय बनसोडे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Dharmpal Meshram : माफी कसली, कठोर कारवाई करा 

जयदीप कवाडे म्हणाले, काँग्रेसी विचारसरणीचे अनुसरण करणारे नेहमीच बाबासाहेबांचा विरोध करीत आहेत. संविधान निर्मात्याच्या चळवळीचे केंद्र असलेल्या महाडमध्ये आंदोलन करून आपण आंबेडकरवादी असल्याची सर्कस काल जितेंद्र आव्हाडांनी केली. आंदोलन करण्याची भूमिका ही स्पष्ट असावी. त्यांनी मनस्मृतीचा विरोध करण्याऐवजी महामानवाला विरोध करण्याचाच घाट त्यांच्या कृतीतून दिसून आला. यामुळे संपूर्ण समाजात असंतोष निर्माण करण्याचे काम आव्हाडांनी केले आहे. असे कृत्य करताना त्यांच्या डोक्यात आणि ओठात काय हे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 30 मे गुरूवारी विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!