महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मध्यरात्री गोवारी बांधवांना मिळाला दिलासा

Assembly Election : माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुकेंनी फिरवली जादुची काडी

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीचा माहौल. मध्यरात्रीचा अंधार. सर्वत्र पसरलेली निरव शांतता. या वातावरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगल्याचा परिसर. अलीकडेच सुरक्षेत वाढ झाल्यानं पोलिस डोळ्यात तेल घालून नव्हे डोळे तेलात बुडवून पहारा देत असतात. मध्यरात्रीकडं जसजसा घड्याळीचा काटा जातो. तसतसं काही लोक फडणवीस यांच्या बंगल्याजवळ जमू लागतात. पोलिस सतर्क असतातच. अशात एक वाहन येऊन थांबते. वाहनाचं दार उघडल्यानंतर एक व्यक्ती खाली उतरतात. त्यानंतर संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा होतो.

कारमधून उतरणारे हे व्यक्ती असतात देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके. फडणवीसांच्या बंगल्याभोवती गोळा झालेले लोक असतात गोंड-गोवारी समाजाचे. गेल्या अनेक दिवसांपासून गोंड, गोवारी आणि ओबीसी समाजासाठी डॉ. परिणय फुके हे लढा देत आहेत. या सर्व परिस्थिती ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील कथानकाप्रमाणे योग जुळून येतात आणि मध्यरात्री गोंड, गोवारी समाजाचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटतं.

ओम फट् स्वाहा

गोंड, गोवारी समाज गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. न्याय मिळत नसल्यानं समाजानं निवडणुकीवर बहिष्काराचं अस्त्र उगारलं होतं. 1985 मध्ये तेव्हाच्या सरकारनं जीआर काढला होता. त्यामुळं गोंड-गोवारी समाज संतापला. त्यामुळं 1994 मध्ये या समाजानं आंदोलन केलं. नागपुरात गोंड-गोवारी समाजावर पोलिसांनी बेछूट गोळीबारही केला होता. तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या गोळीबारात 114 गोवारी बांधवांना प्राण गमवावे लागले होते. तेव्हापासून गोंड, गोवारी समाज आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहे. या समाजाच्या हक्कासाठी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पुढाकार घेतला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी अशी काही जादूची काडी फिरवली की समाजाचं शिष्टमंडळ थेट फडणवीस यांच्या भेटीसाठी आलं.

Amit Shah : छत्तीसगडबाबत सांगितला मोठा प्लान

महाविकास आघाडीकडून या समाजाला भुलविण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू होते. मात्र गोंड, गोवारी समाजावर गोळीवार करणारे ‘तात्या विंचू’ हेच होते हे डॉ. फुके यांनी समाजातील नेत्यांच्या लक्षात आणून दिलं. गोंड, गोवारी समाजालाही ही बाब लक्षात आली. त्यामुळं दिवसभराच्या प्रचारानंतर नागपुरात मुक्कामी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी डॉ. फुके गोवारी बांधवांना घेऊन पोहोचले. या समाजाला आपल्या बाजूनं करण्यात डॉ. फुके यांना यश आल्याचं यावरून दिसत आहे. त्यामुळं गोंड, गोंवारींवर अन्याय करणाऱ्यांचा डॉ. फुके यांनी ऐन निवडणुकीपूर्वी ‘ओम फट् स्वाहा’ केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. डॉ. फुके यांचं हे पाऊल भाजपसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!