देश / विदेश

Modi 3.0 : म्हणे जनतेने विश्वासघात केला

PM Oath Taking Ceremony : अयोध्येतील जनतेवर भडकले स्वामी रामभद्राचार्य

Political News : एनडीएचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तुलसी पीठाधीश्वर स्वामी रामभद्राचार्य हे देखील पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी केलेल्या एका विधानाचीच चर्चा आहे. स्वामी रामभद्राचार्य यांनी अयोध्येतील जनतेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत. ते एक कार्यक्षम प्रशासक आणि यशस्वी पंतप्रधान आहेत. अयोध्या आणि उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागात भाजपचा पराभव झाल्यानंतर मला वाईट वाटले.

लोकांनी भाजप आणि मोदींचा विश्वासघात केला. आशा होती अयोध्येतून भाजपाला सर्वांत जास्त बहुमत मिळेल. विजयाच्या मार्गावर सरकार स्थापन होईल. परंतु लोकांद्वारे निवडणुकीतून मिळणारी वागणूक एक विश्वासघात ठरला आहे, असे रामभद्राचार्य म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार 5 वर्षे जोरदारपणे चालेल. आणखी 10 खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. लवकरच भाजप स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवेलच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होणे ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

तिसऱ्यांदा शपथ

नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा होत आहे. 9 जून रोजी राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज व मनोरंजन विश्वातील कलाकारांसह आठ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांनी पाठिंब्याचे पत्र सादर केले. त्यानंतर मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.

Uttam Jankar : अजितदादांनी गुरंढोरं सांभाळावे

विदेशी पाहुणे येणार

भारताचे ज्या देशांशी घनिष्ठ संबंध आहेत, त्यापैकी जवळच्या सात देशांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. श्रीलंका, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि मॉरिशस या आपल्या देशाच्या शेजारील राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिनल विक्रमसिंघे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. मालदीवचे पंतप्रधान महोम्मद मोईज्जू, सेशल्सचे (पूर्व आफ्रिकेतील देश) उपराष्ट्रपती अहमद अफीक, भूतानचे राजे जिम्मे खेसर नामग्याल वांगचूक हे देखील येऊ शकतात. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ (प्रचंड), मॉरीशसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंह रुपून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधीला हजर असतील.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!