महाराष्ट्र

Parinay Fuke : ‘शिल्लक गटाचे उद्धवराव, आपले कर्तृत्व..!’

Uddhav Thackeray : आमदार परिणय फुके यांचा टोला; फडणविसांवरील टिकेला व्यंगचित्रातून उत्तर

Nagpur : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत धमकीवजा विधान केल्यानंतर राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपच्या नेत्यांकडून उद्धव यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आता यामध्ये आमदार परिणय फुके यांनी देखील व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव यांना टोला लगावला आहे.

उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले आहे. भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मार्मिक व्यंगचित्र प्रसारित केले आहे. ‘आपण कोण आहोत? आपले एकूण कर्तृत्व काय?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

आपण कोण आहोत? आपले एकूण कर्तृत्व काय? याची थोडीही जाणीव नसताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर ही टीका केली आहे, असा टोला डॉ. फुके यांनी लगावला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्राची आता सर्वत्र जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे फडणविसांवरील टिकेला उत्तर देणारे नागपुरातील ते दुसरेच भाजप नेते आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती.

व्यंगचित्रात काय आहे?

उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’ असा एकेरी उल्लेख करत खालच्या दर्जाची टीका केली होती. उध्दव ठाकरेंच्या या टीकेला आता भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते, प्रवक्ते जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. आमदार डॉ. फुके यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे एक व्यंगचित्र प्रसारित केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे एका बिळातून बाहेर येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाचे चित्र दाखवण्यात आले आहे.

शिल्लक गटाचे उद्धवराव’

‘आपण कोण आहोत? आपले एकूण कर्तृत्व काय? याची थोडीही जाणीव नसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘शिल्लक गटाचे उद्धवराव’ असा आशयाचा मजकूर देखील त्यांनी व्यंगचित्रासोबत पोस्ट केला आहे.

आत्राम, दरेकर यांचे प्रत्युत्तर

उद्धव यांच्या विधानावर मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘कोण राहील, कोण जाईल हे जनताच ठरवेल. लोकशाहीमध्ये जनतेकडे याचे अधिकार आहेत,’ अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे. तर दरेकर म्हणाले, ‘भूंकणारा कुत्रा कधी चावत नाही ही आपल्यात म्हण आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही त्यांनी तेच केले. मविआला सरकारमधून बाहेर काढले आणि पुन्हा फडणवीसांनी सरकार बनवले. तरीही उद्धव ठाकरे आणि राऊत यांनी गरळ ओकणे थांबवले नाही. या दोघांनाही देवेंद्रद्वेषाने पछाडले आहे.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!