महाराष्ट्र

BJP : अब्दूल सत्तारांवर दानवे भडकले

Raosaheb Danve : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाजपा-राष्ट्रवादीला नव्हते निमंत्रण

Political War : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी (दि.२) सिल्लोडमध्ये घेतलेला कालचा कार्यक्रम सरकारी असूनही भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला बोलवलं नाही. सत्तार वारंवार म्हणतात की, ‘मी जालना आणि सिल्लोड भागातील मराठा नेतृत्व संपवणार आहे’. त्यांनी आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केला, असा गंभीर आरोप करीत भाजप नेते रावसाहेब दानवे सत्तारांवर भडकले.

सिल्लोड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे शुक्रवारी (दि.२) आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ महिलांना प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. जिल्ह्यात दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

या कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार तसेच अन्य नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळापासून सिल्लोड येथे येईपर्यंत रस्त्यात लागणाऱ्या प्रत्येक गावात स्वागत करण्यात आले. तेथेही महिलांनी त्यांना ओवाळले व राखी बांधली. सिल्लोड शहरात तर मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला. रोड शोद्वारे सिल्लोडवासियांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.

मात्र शुक्रवारच्या कार्यक्रमात महायुतीमधील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीळ नेते मंडळी दिसून आली नाही. त्यावर आज खुलासा करताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आगपाखड केली. ते म्हणाले कि, कार्यक्रम सरकारी असूनही भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला बोलवलं नाही.’

Pravin Darekar : उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले

देवेंद्र फडणवीसांची घेतली बाजू 

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे वसूल केले जायचे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, असा आरोप सचिन वाझे यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे उतरले आहेत. त्यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली असून विरोधकांवर निशाना साधला आहे.

प्रकरण थांबायला हवं होतं

रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवलं असं अनिल देशमुख म्हणाले होते. समित कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावेळी हा वाद संपायला हवा होता. पण त्यानंतरही राष्ट्रवादीचे अनेक नेते फडणवीस यांच्यावर आरोप करत होते. तेव्हाच फडणवीस यांनी शांत राहायला सांगितलं होतं. तुमच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता सचिन वाझे यांनी आज आरोप केला की त्यांच्याकडून अनिल देशमुख पैसे घेत होते, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

हा एकमेव धंदा

यावेळी त्यांनी काही लोकांना टोलेही लगावले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्जन गृहस्थ आहेत. जनतेच्या हिताच्या योजना राबवणारे आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा सबळ पाठिंबा आहे. पण केवळ एकनाथ शिंदे यांना पुढे करून राज्यातील योजना आणायच्या, त्यामार्फत लूट करायची हा एकमेव धंदा सुरू आहे. सरकारची लूट करणं आणि आपल्याला फायदा मिळवणं हा एक भाग वेगळा आहे. पण आपल्या मतदारसंघातील जनतेच्या जमिनी बळकावणं योग्य नाही. सील्लोडमध्ये एका शेतकऱ्याची जमीन बळकावली, त्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांना फक्त काळे झेंडे दाखवले. त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे. यांनी कुणाच्या जमिनी बळकावल्या, कुणाकुणावर अतिक्रमण केलं याचा शोध घेतला पाहिजे. सरकार आणि पोलीस यंत्रणांनी शोध घेतला पाहिजे.काळे झेंडे दाखवणं हा एक भाग आहे. पुढे बघा काय होतं ते, असा सूचक इशारा त्यांनी नाव न घेता सत्तारांना दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!