महाराष्ट्र

Navnit Rana : प्रक्षोभक बोलण्यात विरोधकच आघाडीवर

BJP On Shiv Sena : सुषमा अंधारे यांनी जुने व्हिडीओ लावून तपासावे

Maharashtra Politics : सुषमा अंधारे आणि विरोधी पक्षातील नेते भाजपवर टीका करीत आहेत. त्यांनी त्यांचेच जुने व्हिडीओ तपासून घ्यावे. कोणी प्रक्षोभक बोलण्यास सुरुवात केली, याचे उत्तर त्यांना मिळेल, अशी टीका भाजपच्या नेत्या तथा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. पुणे येथे आयोजित भाजपच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली. 

भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे पुण्यात (Pune) अधिवेशन आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने काम केले पाहिजे, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे पुण्यात हे अधिवेशन होत आहे. जनतेचा आजही भाजपवर विश्वास आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार भाजपला कौल देतील असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला. विशाळगडावरील अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले. त्यानंतर येथे हिंसाचार झाला. यासंदर्भातही माजी खासदार राणा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकोप्याने राहावे

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण सगळे आहो. त्यामुळे सगळ्यांची तशाच पद्धतीने राहिले पाहिजे. एकोप्याने राहिले पाहिजे, असे राणा विशाळगडाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाल्या. काही लोक आजही सकाळी जाग आल्यापासून टीव्हीसमोर बोलत असतात. सायंकाळ झाली तरी त्यांची बडबड संपत नाही. अशा लोकांवर बोलण्याची अजिबातच इच्छा नाही. भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. भाजपमधील सगळेच जनतेच्या हितासाठी काम करतात. विरोधक उगाच बडबड करीत राहतात. त्यांना ठाऊक आहे की, भाजप बोलायला लागली तर त्यांची दुकान बंद होतील. म्हणून हे लोक टीका करतात. आता पक्षाने विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी टीम तयार केली आहे. आता त्यांची बडबड नक्कीच बंद होईल, असे राणा म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांच्यासंदर्भात खूप काही बोलण्यासारखे नाही. त्यांनी त्यांचे जुने व्हिडीओ पाहून घ्यावे. त्यानंतर त्यांनी भाजपवर बोलावे. त्यांनी जर आपले जुने व्हिडीओ पाहिले तर त्यांना भाजपवर बोलण्याचा कोणताही अधिकारी उरणार नाही. भाजपने आजपर्यंत कोणावरही व्यक्तीगत हल्ला केलेला नाही. आजपर्यंत भाजपने प्रथम कोणावरही खालच्या भाषेत टिप्पणी केलेली नाही. परंतु सुषमा अंधारे आणि विरोधकांनी अनेकदा मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याचे भानही त्यांना राहिले नाही. त्यामुळे भाजपकडून प्रक्षोभक बोलले जाते, हे बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असे राणा यांनी नमूद केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!